vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आताची मोठी बातमी– मुंबईतील बांद्रा  न्यायालय येथील न्यायालयीन कर्मचारी यांचा बांद्रा न्यायालयाबाहेर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन; १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संप

आताची मोठी बातमी– मुंबईतील बांद्रा  न्यायालय येथील न्यायालयीन कर्मचारी यांचा बांद्रा न्यायालयाबाहेर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन; १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संप

 

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ (गट क व गट ड), बेलीफ महासंघ तसेच महाराष्ट्र स्टेट ज्युडिशियल स्टेनोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने १७ नोव्हेंबर २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर बांद्रा न्यायालयाच्या बाहेर न्यायालयीन कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलनाला बसले आहेत. कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवत आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे

प्रमुख मागण्या :- नामदार उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणीत वाढ मिळावी.- समान कामासाठी समान वेतन मिळावे.- न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात यावा.या आंदोलनात सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन महासंघ आणि संघटनेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकजूट हीच आपली ताकद! समान काम – समान वेतन!”बांद्रा न्यायालयाबाहेर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे. या बेमुदत संपाचा न्यायालयीन कामकाजावर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र युवा जलदूत’ देणार जलसंधारणाचा संदेश

१२ एप्रिल रोजी ठाण्यात पहिल्यांदाच ‘कोकणची लोकधारा’डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव

राज्यातील ५७ सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लागणार· ८ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार, पंधरा हजार कोटींच्या कर्जास मान्यता…

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीपुरवठा…

ज्येष्ठ पत्रकार श्री. अभय मोकाशी यांचे निधन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अलिबागमध्ये अभिवादन