पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतीय उद्योग क्षेत्राला उत्पादनांच्या गुणवत्तेचे मानदंड उंचावण्याचे आणि आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन!
नवी दिल्ली प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतीय उद्योग क्षेत्राला उत्पादनांच्या गुणवत्तेचे मानदंड उंचावण्याचे आणि आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन!
दिल्ली येथे फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आणि वार्षिक अधिवेशनाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी २० वर्षांच्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ‘इंडिया फर्स्ट’ हा दृष्टिकोन मार्गदर्शक तत्त्व म्हणून स्वीकारण्याचे आवाहन भारतीय उद्योग क्षेत्राला केले.
देशांतर्गत क्षमता अधिक मजबूत करण्यासह जागतिक स्तरावर स्पर्धात्मकता वाढवण्यावर त्यांनी भर दिला. भारतीय उद्योगांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानदंड पूर्ण करावेत आणि भारतीय उत्पादनांची जागतिक बाजारपेठेतील व्याप्ती वाढवावी,
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ‘इंडिया फर्स्ट’ हा दृष्टिकोन मार्गदर्शक तत्त्व म्हणून स्वीकारण्याचे आवाहनही त्यांनी केले.
उद्योगांनी देशांतर्गत बाजारपेठेपुरते मर्यादित न राहता जागतिक दृष्टिकोन स्वीकारावा, आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या गरजा समजून घ्याव्यात आणि नव्या संधींचा शोध घ्यावा, असे पंतप्रधानांनी सांगितले.
तसेच, कृषी क्षेत्रातील उद्योगांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित करत, देशाच्या विकासाच्या पुढील टप्प्याला दिशा देण्यासाठी उद्योग क्षेत्रातील नेत्यांनी आपले विचार आणि सूचना खुलेपणाने मांडाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.