vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

अरबी समुद्रातील उच्च भरतीच्या लाटांचा ऑरेंज अलर्टमुळे मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन- किनारपट्टीवरील नागरिक – पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळण्याचे आवाहन

अरबी समुद्रातील उच्च भरतीच्या लाटांचा ऑरेंज अलर्टमुळे मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन-

किनारपट्टीवरील नागरिक – पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळण्याचे आवाहन

मुंबई, प्रतिनिधी  : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीसाठी उच्च भरतीचा (High Tide) २४ तासांचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने मच्छीमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

अरबी समुद्रात कमी तीव्रतेचा भूकंपामुळे कोणताही समुद्री धोका निर्माण झालेला नसला, तरी उच्च भरतीच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे टाळावे, किनाऱ्यावर उभ्या असलेल्या नौका, ट्रॉलर आणि मासेमारी साहित्य सुरक्षितपणे बांधून ठेवावे, तसेच किनारपट्टीवरील नागरिक, पर्यटक आणि लहान मुलांनी समुद्रकिनाऱ्यावर किंवा खडकाळ भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय, स्थानिक मत्स्यव्यवसाय विभाग, किनारी प्रशासन आणि अधिकृत हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी सकाळी अरबी समुद्रात वसई-विरार किनारपट्टीपासून सुमारे ५७ किलोमीटर अंतरावर, ५ किलोमीटर खोलीवर कमी तीव्रतेचा भूकंप नोंदविण्यात आला असला, तरी त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजून ३३ मिनिटांनी रिश्टर स्केलवर ३.२ तीव्रतेचा भूकंप नोंदविण्यात आला. या भूकंपाचे धक्के जमिनीवर कुठेही जाणवले नसून कोणतीही हानी झाल्याची नोंद नाही. तसेच इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (INCOIS) यांनी त्सुनामीचा कोणताही इशारा किंवा अलर्ट जारी केलेला नसल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने हो स्पष्ट केले आहे.

समुद्रात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास भारतीय तटरक्षक दलाच्या १५५४, किनारी सुरक्षा हेल्पलाईन १०९३ तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या १०७० या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

एसआयआरच्या पुढील टप्प्यातील प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व सर्वसमावेशक ठेवा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम पुढील टप्प्यातील कामांसाठी विभागाची यंत्रणा सज्ज!

विद्यापीठांनी ‘स्कूल – कनेक्ट’ व महिला सक्षमीकरणासाठी ‘स्वयंसिद्धा’ उपक्रम कसोशीने राबवावेत – राज्यपाल जिष्णु देव वर्मा अंमलबजावणीचा त्रैमासिक अहवाल लोकभवन येथे पाठवण्याची सूचना

रुद्रांश पाटीलच्या कामगिरीने ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा-आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या रुद्रांश पाटीलचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले अभिनंदन.

vishwatmaklokswamivarta

जनगणनेसाठी आवश्यक घरांचे गट व सीमांकन करण्याचे काम वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया 

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर,छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील पिकांच्या स्थितीची करणार प्रत्यक्ष पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

vishwatmaklokswamivarta

नियोजन समितीचा १०० टक्के निधी वेळेत खर्च करा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे निर्देश २५ तारखेपर्यंत शहरात हॉकर्स झोन करा; फूटपाथ अडवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

vishwatmaklokswamivarta