vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने द्यावा -डॉ. किरण लहामटे#सेवासंकल्पअभियान अंतर्गत राणी दुर्गावती जयंती निमित्त राजूर येथे आदिवासी महिला बचत गट मेळावा व शासकीय सेवा शिबिर संपन्न

आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने द्यावा -डॉ. किरण लहामटे#सेवासंकल्पअभियान अंतर्गत राणी दुर्गावती जयंती निमित्त राजूर येथे आदिवासी महिला बचत गट मेळावा व शासकीय सेवा शिबिर संपन्न

अहिल्यानगर प्रतिनिधी-शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होण्याची गरज आहे. नागरिकांना शासकीय सेवांसाठी वारंवार शासकीय कार्यालयांमध्ये यावे लागू नये. यासाठी सर्व शासकीय योजना लाभ प्राधान्याने व लोकाभिमुख होऊन एकाच ठिकाणी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन अकोले मतदार संघाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले.

सेवा संकल्प अभियाना अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजूर, व राणी दुर्गावती जयंती निमित्त आदिवासी महिला बचत गट मेळावा व शासकीय सेवा शिबिर राजूर येथील अक्षय साई लॉन्स येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी .प्रकल्प अधिकारी राजूर येथील देवकन्या बोकडे श्री अकोले तहसीलदार सिद्धांत मोरे, गटविकास अधिकारी अमर माने , महिला व बालविकास अधिकारी केदार नांगरे ,वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळ प्रतिभा सोनवणे, कृषी अधिकारी, श्री. अतुल पवार . मनोज पैठणकर, श्री. तुषार पवार, श्री. योगेश ढोणे, श्री. दीपक कालेकर, श्री. संजय सुसलादे लेखा अधिकारी व

प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी वृंद उपस्थित होते.आदिवासी नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करावी. प्रशासन व नागरिकांमधील संवाद वाढल्यास अनेक प्रश्न जागेवरच मार्गी लागू शकतात. पात्र लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाहीत, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन आमदार लहामटे यांनी केले.राज्य शासनामार्फत दि. १७ सप्टेंबर ते दि. १७ ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान २०२६ राबविण्यात येत आहे. शासनाच्या योजनाचा प्रत्यक्ष लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा, तसेच नागरिकांच्या अडचणींचे स्थानिक पातळीवर निराकरण व्हावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

आदिवासी मेळावा व शासकीय सेवा शिबिरात सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनहक्क अधिनियम २००६ नियम २००८ व सुधारित नियम २०१२ च्या प्रभावी अंमलबजावणी अंतर्गत ७ ई आणि १२ ई चे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. महसूल विभागामार्फत जातीचे दाखले, उत्पन्न व रहिवासी दाखले, आधार सेवा, वनहक्क आदिवासी महिला बचत गटांच्या सबलीकरणासाठी उपलब्ध योजनांची माहिती देण्यात येऊन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या शिबिरात नागरिकांनी विविध समस्या व मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नाबाबत मार्गदर्शन केले. एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

पुष्पाताई लहामटे, नीता आवारी, उमेदचे श्री. कुंदन कोरडे, प्रकल्प कार्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी केले.

संबंधित पोस्ट

कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ‍ॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’चे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील अभोडा झरी गावासाठी टँकर मंजूर

मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा मुंबईत ‘शून्य जिवीतहानी’ उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे: उपमुख्यमंत्री यांचे निर्देश

आज संसद भवन परिसरात लोकसभेतील विरोधी पक्षनेते . राहुल गांधी, काँग्रेस नेत्या . प्रियंका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे नेते  अखिलेश यादव यांच्यासह INDIA आघाडीच्या खासदारांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने..

मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन

चाकण एमआयडीसीतील रस्ते व पायाभूत सुविधांची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी रस्ते, वाहतूक, पावसाच्या पाण्याचा निचरा, अतिक्रमणे व पार्किंगच्या प्रश्नांचा घेतला आढावा; कालबद्ध उपाययोजनांच्या सूचना