vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

आषाढी वारीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या विशेष स्वच्छता पथकाचे पंढरपूर नगरी स्वच्छता कार्य

आषाढी वारीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या विशेष स्वच्छता पथकाचे पंढरपूर नगरी स्वच्छता कार्य

 

     नवी मुंबई प्रतिनिधी-  आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथे लाखो भाविक दाखल होत असल्याने परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘स्वच्छता अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार पंढरपूर नगरी स्वच्छतेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे विशेष पथक पाठविण्यात आले होते.

          नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी पंढरपूरला जाणा-या विशेष पथकाच्या नवी मुंबईतून पंढरपूर प्रस्थानाप्रसंगी आवर्जून उपस्थित राहून या पथकास उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या होत्या.

  •           या विशेष स्वच्छता पथकाने 21 आणि 22 जुलै 2026 रोजी 2 दिवस अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून सेवाभावाचे दर्शन घडविले.

          पथक प्रमुख स्वच्छता निरीक्षक श्री. लवेश पाटील आणि श्री. नवनाथ ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली 30 स्वच्छता दूतांनी 21 व 22 जुलै असे सलग 2 दिवस विठ्ठल मंदिर परीसर, मार्केट परीसर, चंद्रभागा नदीवरील उड्डाणपूल येथील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत अथक स्वच्छताकार्य केले. त्यासोबतच चंद्रभागा नदीपात्राचीही साफसफाई केली, त्या ठिकाणच्या सार्वजनिक शौचालय परिसराची जंतुनाशक फवारणी करण्यात आली. या कामात सर्व स्वच्छतादूतांनी भक्तीभावाने सेवाभावी वृत्तीने उत्साहात सहभाग घेतला. नवी मुंबई महानगरपालिकेचेच्या या विशेष स्वच्छता पथकाने पंढरपूर शहर स्वच्छ, सुरक्षित व रोगमुक्त ठेवण्यासाठी समर्पित भावनेने कार्य केले व सालाबादाप्रमाणे याही वर्षी वारीतील स्वच्छतेची परंपरा कायम राखली.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील क्रीडा आणि युवा विकास परिसंस्था बळकट करण्यासाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन

५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण-बाल वैज्ञानिक देतील देशाच्या प्रगतीत योगदान- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान! यवतमाळच्या नेर तालुक्यात ३६ तासांत १३३ मिमी अतिवृष्टी! पैनगंगा नदीला महापूर; मलकापूर-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद! तर गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर. 

vishwatmaklokswamivarta

राज्यातील अहिल्यानगर : अकोले तालुक्यातील आजोबा पर्वतावर अडकलेले १५ पर्यटक स्थानिकांच्या मदतीने परतले सुखरूप.

vishwatmaklokswamivarta

राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय,राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव-माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

vishwatmaklokswamivarta