vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जाहीर प्रगटन जालना महानगरपालिका यांचे जाहीर आव्हान

जाहीर प्रगटन जालना महानगरपालिका यांचे जाहीर आव्हान

जालना प्रतिनिधी-जालना शहरातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, सध्या दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शहरास पाणी सोडल्यानंतर नागरिकांनी पाणी भरल्यानंतर तात्काळ नळ बंद करणे आवश्यक आहे. व पाणी रस्त्यावर, नालीमध्ये किंवा इतर ठिकाणी वाहून जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रत्येक नागरिकाने नळांना योग्य तोट्या बसवाव्यात

घरगुती नळ जोडणी, नळ, तोट्या व अंतर्गत जलवाहिनीतील गळती अथवा आवश्यक दुरुस्तीची सर्व कामे दिनांक 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करून घ्यावीत. त्यानंतर पाण्याची गळती अथवा अपव्यय आढळून आल्यास संबंधितांवर खालीलप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल

ज्या ठिकाणी पुरेसा पाणीपुरवठा होतो, अशा ठिकाणी महानगरपालिकेच्या जलवाहिनीवरून थेट पाणी खेचण्यासाठी विद्युत मोटार/पंपाचा वापर करू नये, अनधिकृत नळ जोडणी तात्काळ अधिकृत करून घ्यावी, तसेच महानगरपालिकेच्या जलवाहिनीत परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये. रस्त्यावर वाहने धुणे, घरासमोरील रस्ता धुणे किंवा कोणत्याही प्रकारे पाण्याचा अपव्यय करू नये. उल्लंघन आढळल्यास प्रथम वेळी रुपये 5,000/-, द्वितीय वेळी रुपये 10,000/- व तृतीय वेळी रुपये 25,000/- दंडात्मक कारवाई, तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल.

सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे

-00000-

संबंधित पोस्ट

शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या ‘महाभूमी स्टॅक’ प्रणालीचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईत 1 जुलै रोजी घडलेल्या 2 दुर्दैवी घटनांच्या अनुषंगाने आरोग्य व विद्युत विभागाच्या अधिका-यांवर निलंबनाची कारवाई

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालखी महामार्गाची पाहणी

सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक २०२६; सांगली जिल्ह्यातील ५ तर सातारा जिल्ह्यातील ७ मतदान केंद्रांवर होणार मतदान

भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट