vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांकडून राणीघाट अपघातातील जखमींची विचारपूस

जिल्हाधिकाऱ्यांकडून राणीघाट अपघातातील जखमींची विचारपूस

       अमरावती, प्रतिनिधी : धारणी तालुक्यातील राणीघाटामध्ये झालेल्या अपघातातील पाच जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांची जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी भेट घेऊन अपघात आणि प्रकृतीची माहिती घेतली. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याची सूचना केली.     यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार आदी उपस्थित होते.

   अपघातामधील अर्चना दारासिंगे, रा. कंजोली, गेरुबाई देवळे, रा. मोठेखेडे, रिता राठोड, रा. सिनंबद, देवा धांडे, रा. कंजोली, मुनी दहीकर, रा. कंजोली, विकेश दहीकर, सालाई, सर्व ता. धारणी यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील रिता राठोड यांचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

   जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सुरवातीला अपघात कक्षातील जखमी भुनी दहीकर यांना भेट दिली. यावेळी त्यांनी नातेवाईकांकडून अपघाताची माहिती घेतली. अपघात कशाप्रकारे घडला, वाहनात किती नागरिक होते, अपघाताचे कारण आदींची माहित घेण्यात आली. त्यानंतर अपघातातील अर्चना दारसिंगे या गर्भवती महिलेची भेट घेतली. अपघातामुळे माता व बाळ दोन्ही सुरक्षित ठेवण्यासाठी उपचार करावेत. त्यांची तब्येत पूर्ण बरी झाल्यानंतरच रूग्णालयातून सुट्टी द्यावी, अशा सुचना केल्या. शल्यचिकित्सा कक्षात दोन जणांवर शस्त्रक्रीया करण्यात येत आहे. याठिकाणीही श्री. येरेकर यांनी भेट देऊन जखमींच्या नातेवाईकांकडून माहिती घेतली.

     राणीघाटातील अपघाताला वाहनचालक कारणीभूत आहेत. वाहनचालकाने वाहन सुस्थितीत नसताना माल आणि प्रवासी जादा प्रमाणात भरले. तसेच धावत्या वाहनामध्येच बिघाड झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यातील जमखींची विशेष उपचार देऊन मृत्यू होऊ नये, याची काळजी घ्यावी. अपघातातील जखमींवर मोफत उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे जखमींनी पूर्ण उपचार घेऊन घरी जावे. जखमींवर योग्य उपचार करावेत. आवश्यकता भासल्यास खासगी डॉक्टरांची सेवा घेण्यात यावी. जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांनीही उपचारासाठी सहकार्य करावे, असे श्री. येरेकर यांनी सांगितले.

     मेळघाटमध्ये झालेल्या अपघातातील वाहनचालकांवर सक्त कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांना दिल्या.

000000

संबंधित पोस्ट

विधानपरिषद कामकाज/ प्रश्नोत्तरे-उरण येथील ‘भारत मुंबई कंटेनर टर्मिनल’ला जोडणारा उड्डाणपूल सुरक्षित-सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले· जुलैअखेर दुरुस्ती पूर्ण होणार

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावरील संगीत रस्त्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

चीनची अडवणूक   भक्तांचे व्हिसा रोखले कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेलेले पुण्यातील 52 महादेव भक्त नेपाळमध्ये अडकले

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून बाधित नवजात बालकांच्या प्रकृतीची विचारपूस जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त कक्षाची पाहणी

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईतील रेल्वे स्टेशनवर महानगरपालिकेमार्फत सखोल स्वच्छता मोहीमा

बालविवाह निर्मुलनासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन