vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

दिव्यांग विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पाने शाळेत स्वागत

दिव्यांग विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पाने शाळेत स्वागत

मुंबई, प्रतिनिधी : शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव डॉ. माणिक गुरसाळ यांनी ताडदेव येथील व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या अंध विद्यालयाला भेट देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

डॉ. गुरसाळ यांनी विद्यालयातील विविध वर्गांना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी डॉ. गुरसाळ यांना आयएएस परीक्षा कशी असते, त्यासाठी कोणती तयारी करावी लागते यासंदर्भात प्रश्न विचारले. डॉ. गुरसाळ यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना अत्यंत सहजतेने उत्तरे देत मार्गदर्शन केले व शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या

दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे उपसचिव विष्णुदास घोडके, अवर सचिव साईप्रसाद मुकदाडवार, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तथा सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण विभाग समाधान इंगळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी रूपाली पाटील, व्हिक्टोरिया मेमोरियल अंध महाविद्यालयाच्या प्राचार्या रजनी हिरमेठ; तसेच संस्थेच्या अध्यक्षा मीना देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.

दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शतकाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या संस्थेने समाजात शिक्षण आणि स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केला आहे. सन 1902 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेत दृष्टिहीन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह निवास, भोजन, संगणक प्रशिक्षण, संगीत, क्रीडा आणि विविध व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते.t

मुंबईतील ताडदेव परिसरात असलेल्या या संस्थेने हजारो दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ग्रंथालय सुविधा; तसेच अन्य विविध कौशल्यविकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत.

‘00000

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर 22 जुलैला सांगलीत – नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन 

नातेवाईकांपासून दूर असलेल्या बंद्यांसाठी कारागृहात रक्षाबंधन

vishwatmaklokswamivarta

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील 100 विहिरी स्वच्छ करून त्यातील पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त वापर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय..

सुरक्षित आणि शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा करावा – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- सार्वजनिक गणेशोत्सव जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न- ध्वनिप्रदूषण नियम व वेळेच्या मर्यादा पाळण्याचे आवाहन- चार दिवस रात्री 12 वाजेपर्यंत देखावे सुरू राहणार- शांतता व सलोखा राखा, पोलीस, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे 

vishwatmaklokswamivarta

केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या पात्र उमेदवारांना माहिती सादर करण्यासाठी २१ मार्चपर्यंतची मुदत; गुणपडताळणीही उपलब्ध

सेवाकर्मी पुरस्कार” कार्यक्रमात जिल्हा परिषद ठाणेची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कार्यालयांमध्ये स्थान – १०० पैकी ८० गुणांकन…

vishwatmaklokswamivarta