vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दुष्काळ परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज *चारा साक्षरता अभियानाची सुरुवात *जिल्हाधिकाऱ्यांचा थेट शेतकऱ्यांशी संवाद

दुष्काळ परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज *चारा साक्षरता अभियानाची सुरुवात *जिल्हाधिकाऱ्यांचा थेट शेतकऱ्यांशी संवाद

 अमरावती, प्रतिनिधी : जिल्ह्यातील संभाव्य चारा टंचाई आणि पर्जन्यमानातील तूट लक्षात घेता पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता करण्यासाठी जिल्ह्यात ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात नांदगाव पेठ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात करण्यात आली.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर अध्यक्षस्थानी होते. त्यांनी चारा व्यवस्थापनाच्या प्रात्यक्षिकांची व्यक्तिशः पाहणी करून तज्ज्ञांशी संवाद साधला. तसेच, टंचाईच्या काळात चारा संवर्धनासाठी पशुपालकांकडून अवलंबल्या जाणाऱ्या पद्धतींबाबत शेतकरी आणि पशुपालकांशी थेट चर्चा केली. जिल्ह्यात संभाव्य टंचाई निर्माण होण्यापूर्वीच करावयाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून, या कार्यक्रमात पीक अवशेषांचे जतन, संवर्धन आणि पोषणमूल्यवर्धन यावर आधारीत प्रात्यक्षिके आणि सादरीकरणे करण्यात आली.

कमी पाचक व निकृष्ट वाळलेल्या कडबा, पेंढा चाऱ्याची उपयोगिता वाढविण्यासाठी युरिया प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पशुसंवर्धन विभागाचे गुणवत्ता नियंत्रण सहाय्यक आयुक्त डॉ. तुषार गावंडे यांनी दिले. टंचाईपूर्वी हिरवा चारा उपलब्ध असतानाच जास्तीत जास्त मुरघास तयार करण्यासाठी, बुल मदर फार्म, पोहरा येथील वैरण विकास अधिकारी श्री. गिरी यांनी मुरघास निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखविले.

 हिरव्या चाऱ्याचा पर्यायी स्रोत म्हणून हायड्रोपोनिक हिरवा चारा निर्मितीचे सादरीकरण पशूधन विकास अधिकारी तथा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन नागरे यांनी केले. पीक अवशेषांची नासाडी किंवा जाळणे टाळून कडबाकुट्टी यंत्राचा अधिकाधिक वापर करावा आणि चारा बचतीसाठी या सर्व शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन पशुपालकांना करण्यात आले.

यावेळी डॉ. पंकज रवाळे यांनी राज्यात नव्याने लागू झालेली पशुधन विमा योजनेबाबत माहिती दिली. व्हीएमडीडीपी योजनेबाबत माहिती डॉ. मनोज आडे यांनी दिली. डॉ. जयंत माहुरे, डॉ. नंदकिशोर अवघड यांनी पशुपालकांना प्रस्तावित असलेली मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उत्पादकता कार्यक्रम बाबत विस्तृत मार्गदर्शन केलेजिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपआयुक्त डॉ. वल्लभ जोशी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आगामी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चारा संवर्धनाची नितांत आवश्यकता आणि टंचाईचा सामना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची भूमिका व पूर्वतयारी याबाबत मार्गदर्शन केले.

 

00000

संबंधित पोस्ट

दुय्यम निबंधक कार्यालये सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार

ग्रंथ हे मनुष्याचे सच्चे मित्र – राज्यपाल आचार्य देवव्रत ‘घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स’ कथासंग्रहाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

2 वर्षात 200 एस. टी. बसेस पालघर वासियांना मिळणार – आमदार विलास तरे# परिवहन मंत्री तथा सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीत निर्णय

रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी मतदारयादीतील ‘मॅपिंग’ प्रक्रियेत सहभागी व्हावे– जिल्हाधिकारी किशन जावळे

निवृत्तीवेतनधारकांच्या सेवा आता ‘महा-उपलब्धी’ ॲपद्वारे मोबाईलवर निवृत्तीवेतनधारक मेळावा व ॲपविषयक कार्यशाळा उत्साहात

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू