vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रशासन मतदानासाठी सज्ज : विभागीय आयुक्तांनी घेतला आठही जिल्ह्यांचा आढावामतदान केंद्रांवरील सुविधा, सुरक्षा व राजकीय पक्षांच्या बूथ व्यवस्थेची तपासणीशुक्रवार 23 ऑक्टोबरला सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत होणार मतदान

प्रशासन मतदानासाठी सज्ज : विभागीय आयुक्तांनी घेतला आठही जिल्ह्यांचा आढावामतदान केंद्रांवरील सुविधा, सुरक्षा व राजकीय पक्षांच्या बूथ व्यवस्थेची तपासणीशुक्रवार 23 ऑक्टोबरला सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत होणार मतदान

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून, मतदान प्रक्रिया सुरळीत, निर्भय व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.  शुक्रवार दि. 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज बुधवारी दुपारी ऑनलाइन पद्धतीने विभागातील आठही जिल्ह्यांचा आढावा घेतला.या बैठकीत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांतील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, मतदारांसाठी आवश्यक व्यवस्था, मतदान साहित्याची उपलब्धता, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्थेची माहिती यावेळी घेण्यात आली. मतदान केंद्रांच्या परिसरात राजकीय पक्षांच्या बूथ व्यवस्थेसाठी करण्यात आलेल्या नियोजनाचाही आढावा घेण्यात आला.

मतदारांना कोणतीही अडचण न येता मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदान केंद्रांवरील प्रवेश व्यवस्था, आवश्यक सुविधा, दिशादर्शक सूचना आणि मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची सज्जता यांची खातरजमा करण्यावर भर देण्यात आला. मतदान साहित्याचे वितरण, मतपेट्यांची सुरक्षित वाहतूक, मतदानानंतर मतपेट्या जमा करण्याची व्यवस्था आणि मतमोजणी केंद्रावरील तयारी याबाबतही संबंधित जिल्हा प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात आठ जिल्ह्यांचा समावेश असून, निवडणुकीसाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी एकूण 3 लाख 26 हजार 701 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आठ जिल्ह्यांमध्ये 842 केंद्रांवर मतदान होणार आहे. शुक्रवार, दि. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवून मतदान करावयाचे असल्याने मतदारांना योग्य पद्धतीने मतदान करण्याबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

  निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. मतदानाच्या दिवशी उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणींवर तातडीने उपाययोजना कराव्यात आणि सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय राखावा, असे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी यावेळी दिले.

***

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींनी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

महाप्रीतने कालबद्ध पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातशासकीय इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प राबवावा मस्त्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

दुष्काळाच्या काळात अधिकारी मुख्यालय सोडू नका; विनापरवानगी गैरहजर राहिल्यास कठोर कारवाई**जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय रजा नाही; आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार फौजदारी कारवाईचे निर्देश*

vishwatmaklokswamivarta

स्वस्तिक पॅटर्न’ वृक्षलागवड जिल्ह्यात सर्वदूर राबविणार वृक्षलागवडीसाठी वृक्षक्रांती मिशनला सहकार्य करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश 

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे – अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी कृषी विभाग-एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आयोजित चर्चासत्रात महिला शेतकरी केंद्रस्थानी

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महापौर चषक सार्वजनिक व घरगुती श्रीगणेशोत्सव स्पर्धा 2026 मध्ये ऑनलाईन अर्ज भरून सहभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta