vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बालकांसाठी सुरक्षित, भयमुक्त आणि पोषक वातावरण निर्माण करा- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती कदम- सुरक्षित बचपन अभियान 2026 अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

बालकांसाठी सुरक्षित, भयमुक्त आणि पोषक वातावरण निर्माण करा- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती कदम- सुरक्षित बचपन अभियान 2026 अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

        सांगली, प्रतिनिधी: सुरक्षित बचपन अभियान 2026 च्या माध्यमातून बालकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून द्यावी, बालकांच्या समस्या वेळीच ओळखून त्यांना आवश्यक मदत व संरक्षण मिळवून द्यावे, बालकांसाठी सुरक्षित, भयमुक्त आणि पोषक वातावरण निर्माण करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष अदिती कदम यांनी केले.

            राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या मार्गदर्शनानुसार बालकांचे संरक्षण, सुरक्षितता तसेच बालकांच्या हक्कांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने “सुरक्षित बचपन अभियान २०२६” चा (पहिला टप्पा) दिनांक 26 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत जिल्हा परिषद, सांगली, महिला व बाल विकास, सांगली व पोलीस अधीक्षक, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्हा व तालुक्यांमधील विविध शाळा, कॉलेज येथे राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर हे आवाहन करण्यात आले आहे.

            या अभियानांतर्गत बालकांचे संरक्षण, सुरक्षितता व बालहक्काविषयी जनजागृती करणे, बालकांवरील अत्याचार व शोषण रोखणे, बालविवाह, बालमजुरी तसेच बालकांच्या हक्कांचे उल्लंघन, सायबर गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. अभियान कालावधीत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व संबंधित संस्थांच्या माध्यमातून बालसुरक्षाविषयक जनजागृतीपर उपक्रम, मार्गदर्शन, संवाद आयोजित करण्यात येत आहेत. तसेच, बालकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, बालकांच्या समस्या ओळखून त्यांना योग्य वेळी मदत व संरक्षण मिळवून देणे, बालकांशी संबंधित कायदे याविषयी माहिती देण्यात येईल, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि.ग. कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाण्यांचे उन्नतीकरण करावे : राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना राज्यात ‘नैसर्गिक शेती’ची क्रांती आणण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा

हिवरखेडे मका प्रकरणी चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई- मंत्री छगन भुजबळ

नवी मुंबईत ‘हिंद-दी-चादर’श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमासाठी**प्रशासन व समाजघटक सज्ज**ऐतिहासिक समागमासाठी प्रशासन, धार्मिक संस्था व सामाजिक संघटनांचा समन्वय; व्यापक नियोजनाची माहिती पत्रकार परिषदेत

vishwatmaklokswamivarta

मातृतीर्थ सिंदखेड राजात जिजाऊभक्तांचा जनसागर !राष्ट्रमाता जिजाऊंचा ४२८ वा जन्मोत्सव थाटात साजरा

vishwatmaklokswamivarta

650 व्या संत रोहिदास जयंती निमित्त माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

ठाण्यातील काही भागात दोन दिवस पाणी नाही