vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ;मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण यांच्या हस्ते बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप

बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ;मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण यांच्या हस्ते बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप

 

बुलढाणा, प्रतिनिधी : बालकांचे आरोग्य, पोषण आणि शारीरिक विकास सुधारण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी, कोलवड येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण यांच्या हस्ते बालकांना जंतनाशक गोळ्या देऊन करण्यात आला.

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बालकांमधील आतड्यांतील जंतांचा प्रादुर्भाव कमी करणे, रक्तक्षयासारख्या समस्यांना प्रतिबंध करणे तसेच त्यांची पोषणस्थिती आणि शारीरिक वाढ सुधारण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वपूर्ण आहे.

मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभाग यांच्या समन्वयातून नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र बालकांपर्यंत जंतनाशक गोळ्यांचा लाभ पोहोचविण्यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि शिक्षकांच्या माध्यमातून जनजागृती व आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे

या शुभारंभप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद येंडोले, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी राजू धुताडमल, वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता नागलकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. गवळी, समुदाय आरोग्य अधिकारी अरुणदती ठोंबरे, आरोग्य सहाय्यक सुनीता जवंजाळ, तुळशिदास राजपूत, अरुण जाधव आणि गजानन साळोक यांच्यासह ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, आरोग्य विभागातील कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व पात्र बालकांनी राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा लाभ घ्यावा. तसेच मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि महिला व बालविकास विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात 2 हजार 786 दिव्यांग बांधवांनी केली आरोग्य तपासणी आणि साहित्य नोंदणी; लवकरच होणार साहित्य वाटप शिबीर

अटाळी येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवेवरील दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न ;‘अधिक उपचार, कमी रेफरल’ संकल्पनेवर भर; आरोग्य कर्मचाऱ्यांना विविध विषयांवर प्रशिक्षण

असंसर्गजन्य आजारांविरोधात नवी मुंबई महानगरपालिकेची प्रभावी मोहीम

जिल्हा आरोग्य संपन्न करण्यासाठी आरोग्य निर्देशांकांवर भर द्याजिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

एड्स नियंत्रण आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा – जिल्हाधिकारी संतोष पाटील

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलनासाठी विशेष सर्वेक्षण मोहिमेच आयोजन

vishwatmaklokswamivarta