vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई-एमएमआरमध्ये पुढील १५ ते २० वर्षांत ३० लाख घरे बांधणार-सिद्धेश्वर नगर -रमाबाई नगर क्लस्टरचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन‘क्लस्टर’ केवळ इमारतींचा नाही; ६ हजार कुटुंबांना हक्काचे घर सुविधा आणि रोजगार देत नव्या ठाण्याची उभारणी करण्याचा शिंदेंचा निर्धार…

मुंबई-एमएमआरमध्ये पुढील १५ ते २० वर्षांत ३० लाख घरे बांधणार-सिद्धेश्वर नगर -रमाबाई नगर क्लस्टरचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन‘क्लस्टर’ केवळ इमारतींचा नाही; ६ हजार कुटुंबांना हक्काचे घर सुविधा आणि रोजगार देत नव्या ठाण्याची उभारणी करण्याचा शिंदेंचा निर्धार…

ठाणे, प्रतिनिधी : मुंबई-एमएमआरमध्ये पुढील १५ ते २० वर्षांत ३० लाख घरे बांधणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. मुंबई ठाण्यासह मीरा-भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आदी शहरांमध्ये क्लस्टरला चालना देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. युनिफाइड डीसीपीआरमधील बदलांमुळे क्लस्टर आणि एसआरए प्रकल्पांना गती मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर क्लस्टर योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

ठाण्यातील ६ हजार कुटुंबांना सुरक्षित, दर्जेदार घरे देतानाच २३ नागरी सुविधा, रोजगाराच्या संधी आणि नियोजित टाऊनशिप उभारून नव्या ठाण्याचा पाया रचण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. सुमारे २० हेक्टर अर्थात ५० एकर परिसरात विकसित होणाऱ्या या क्लस्टरमध्ये

अनेक सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत.निवासी इमारती नव्हे, तर मोठे रस्ते, मुबलक पाणी, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, गार्डन, मैदान, कम्युनिटी हॉल, जिम्नॅशियम, योगा सेंटर, इनडोअर गेम्स, डिजिटल लायब्ररी, डे-केअर सेंटर, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, महिला सक्षमीकरण केंद्र आणि स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. ‘सिटी विथिन द सिटी’ या संकल्पनेतून हा विकास होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

ठाण्यातील धोकादायक इमारतींच्या दुर्घटनांचा संदर्भ देत शिंदे यांनी क्लस्टरचा प्रवास २० वर्षांच्या संघर्षातून पुढे आल्याचे सांगितले. किननगरमधील साईराज इमारत दुर्घटनेसह अनेक दुर्घटनांनंतर धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर उपोषण, मोर्चे आणि विधानसभेत सातत्याने आवाज उठवला. नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून धोरणात्मक अडथळे दूर करून क्लस्टर प्रत्यक्षात आणल्याचे त्यांनी नमूद केले. किसननगरमधील पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे असून लवकरच रहिवाशांना घरांच्या चाव्या देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

क्लस्टरमध्ये निवासी बांधकामासोबत कमर्शियल विकास आणि स्थानिक रोजगार निर्माण करण्यावर शिंदे यांनी भर दिला. “घरातून उतरायचे आणि जवळच कामाला जायचे,” या ‘वॉक टू वर्क’ संकल्पनेतून स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सिद्धेश्वर तलाव परिसराचे पुनर्विकासासोबत स्वच्छता व सुशोभीकरण होऊन तलावाला मोकळा श्वास मिळेल, असेही ते म्हणाले.

रहिवाशांच्या मागण्यांबाबत कॉर्पस फंड, अतिरिक्त १०० चौरस फुटांची जागा परवडणाऱ्या दरात देणे आणि छोट्या दुकानदारांच्या पुनर्वसनाचा विचार करण्याचे संकेत त्यांनी दिले. “दोन पैसे कमी नफा झाला तरी चालेल; नागरिकांच्या घरांच्या दर्जात कपात करू नका,” अशी स्पष्ट सूचना विकासकांना करताना सरकार आणि महापालिकेकडून आवश्यक सहकार्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड आणि ठाणे-बोरिवली बोगदा यांसारख्या प्रकल्पांमुळे ठाण्याच्या पायाभूत सुविधांना नवी दिशा मिळणार असल्याचे सांगत, क्लस्टरमधील इमारतीही दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आयकॉनिक इमारतींसाठी प्रोत्साहनात्मक एफएसआयची तरतूद असल्याचेही त्यांनी सांगितले

“क्लस्टर म्हणजे केवळ घर नव्हे; चांगले घर, चांगल्या सुविधा, रोजगार आणि बदललेले जीवनमान,” हा संदेश देत शिंदे यांनी हरिवंश राय बच्चन यांच्या ‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती’ या ओळींचा दाखला दिला. अखेरीस विकासकांनी नागरिकांना वेळेत घरे देतानाच चांगल्या सुविधांसोबत मोठा टीव्हीही भेट म्हणून द्यावा, अशी मिश्कील सूचनाही त्यांनी केली.या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, आमदार रविंद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, डॉ. माधव कुसेकर, प्रशांत रोडे, सभागृह नेते हनुमान जगदाळे, विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण,शहरप्रमुख हेमंत पवार, नगरसेवक नारायण पवार, राम रेपाळे, राजेश मोरे, पवन कदम, संजय वाघुले यांच्यासह ठाण्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

……

संबंधित पोस्ट

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात ‘बालस्नेही ग्रामपंचायत’ आणि ‘बालस्नेही प्रभाग’ उपक्रम राबविणार – मंत्री आदिती तटकरे बालकांचे आरोग्य, शिक्षण, सुरक्षा आणि हक्कांवर विशेष भर

महाराष्ट्र शासनाच्या कृतीशील धोरणामुळे क्रीडापटूंना स्थैर्य आणि सन्मान: मंत्री चंद्रकांतदादा पाटील३७२ क्रीडापटूंचे शासकीय सेवेत थेट समावेशन,सांगलीत अखिल भारतीय कनॉईंग, कयाकिंग स्पर्धांचे उत्साही उद्घाटन

संगीताद्वारे आध्यात्मिक उन्नती’ या विषयावर परिसंवाद; कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग-संगीताच्या माध्यमातून साधना करण्यासाठी मार्गदर्शन करणारे गोव्यातील प्रस्तावित विश्वविद्यालय लवकर व्हावे ! – पू. पं. केशव गिंडे*

आगामी अधिवेशनात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष विधेयक मांडणार- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार· केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही राज्यस्तरीय ‘जेंडर रिसोर्स सेंटर’ स्थापन करणार

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

प्रभावी जनसंपर्कासाठी तंत्रज्ञान आणि मानवी संवेदनांचा समन्वय आवश्यक – निवासी आयुक्त आर. विमला ‘माहिती आणि जनसंपर्क ‘च्या राष्ट्रीय जनसंपर्क परिषदेस प्रारंभ