vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी साधणार आभासी संवाद..

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी साधणार आभासी संवाद..

ठाणे, प्रतिनिधी : ‘माय भारत’ (MY Bharat) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दि.२७ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी आभासी संवाद साधणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील बी. के. बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, कल्याण आणि सेवा सदन कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, उल्हासनगर -3 या दोन निवडक महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती ठाणे “माय भारत” च्या जिल्हा युवा अधिकारी मनिषा शर्मा यांनी दिली आहे.

   या कार्यक्रमात संबंधित महाविद्यालयांतील विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक आणि तरुणांसह राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांशी आभासी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असून प्रामुख्याने खेळ, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी जीवनशैली आणि सक्रिय सहभागाचे महत्त्व याबाबत तरुणांना मार्गदर्शन मिळणार आहे.

     राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांना यशस्वी खेळाडूंच्या अनुभवातून प्रेरणा घेता येणार आहे. क्रीडा क्षेत्रातील समर्पण, शिस्त, चिकाटी, तंदुरुस्ती आणि उत्कृष्टतेचे महत्त्वही त्यांना समजून घेता येणार आहे.तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना मिळणार व्यासपीठ..         राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने ‘माय भारत’, राष्ट्रीय छात्र सेना (NCC) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या स्वयंसेवकांना तरुणांमध्ये खेळ, तंदुरुस्ती आणि सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना मांडण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

यामध्ये नाविन्यपूर्ण क्रीडा उपक्रम, सामुदायिक तंदुरुस्ती कार्यक्रम, जनजागृती मोहिमा, सर्वसमावेशक क्रीडा उपक्रम तसेच तरुणांच्या नेतृत्वाखाली राबविता येणारे विविध तंदुरुस्ती उपक्रम यांचा समावेश असू शकतो.

  प्राप्त झालेल्या सर्वोत्तम व नाविन्यपूर्ण कल्पनांची निवड करून राष्ट्रीय स्तरावर त्यांचा विचार व अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे तरुणांना केवळ राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची नव्हे, तर देशातील क्रीडा व तंदुरुस्ती चळवळीला बळकटी देण्यासाठी आपल्या कल्पनांचे योगदान देण्याची संधी मिळणार आहे.

  भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील कल्याण व उल्हासनगर येथे होणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती होण्यास मदत होणार आहे, असे ठाणे “माय भारत” च्या जिल्हा युवा अधिकारी मनिषा शर्मा यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

नीट परीक्षेतल्या पेपरफुटीसह अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरहून संसद भवनावर मार्च, संसद भवन परिसरात  सुरक्षित वाढ…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी बंधनकारक

आप’च्या काही नेत्यांनी त्यांना एक लाजिरवाणी सल्ला दिला “जा आणि गुरुद्वारामध्ये घुसा” मग काय, हे सर्वजण बंगाला साहिब आणि रकाबगंज गुरुद्वारात बळजबरीने घुसले.-आंदोलनाची नौटंकी करण्यात आली होती. या आंदोलनात नेहमीप्रमाणे गदारोळ झालाच, पण एक अशी घटना घडली जिने सर्व शीख बांधवांच्या भावनांना ठेच पोहोचवली आहे.- गुरुद्वारा व्यवस्थापक

vishwatmaklokswamivarta

बीएचएमएस, आणि सीसीएमपी. पात्र डॉक्टरांची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

सर्वपक्षीय बैठकीत मंजूर विषयांवर महासभेत विरोध करणे चुकीचे;ठाण्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे : महापौर शर्मिला पिंपळोलकर

ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी राज्य शासन प्रयत्नशील – मंत्री बाबासाहेब पाटील विविध शेतकरी संघटनांसोबत बैठक संपन्न; केंद्र शासनाकडे शिष्टमंडळ नेणार

vishwatmaklokswamivarta