vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकासकामांची जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.यांनी केली पाहणी

श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकासकामांची जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.यांनी केली पाहणी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात पर्यटनाला चालना देण्यासाठी होत असलेल्या विकास कामांची आज जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी पाहणी केली. विकास कामे दर्जेदार व विहीत वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. तसेच मंदिर परिसरातील विकासकामांची सद्यस्थिती जाणून घेतली.

त्यांचे समवेत उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, अंकिता ताकभाते, कार्यकारी अभियंता स्मिता पवार, उप अभियंता दिलीप कोलते, शाखा अभियंता सागर सावजी, सौरभ चव्हाण, रचनाकार प्रदीप देशपांडे, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, वेरुळ ग्रा.पं. प्रशासक दीपक बागुल, ग्राम प्रशासक गंगाधर गायकवाड, मंडळ अधिकारी विजय चव्हाण, लक्ष्मण जाधव, ग्राम महसूल अधिकारी भूषण रोजेकर, पोलीस पाटील रमेश दोरे आदी उपस्थित होते.

  `जिल्हाधिकारी गौडा यांनी या पाहणीदरम्यान नव्याने उभारण्यात येत असलेल्या भक्तनिवासाची पाहणी केली. भाविकांसाठी उपलब्ध होणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. तसेच मंदिर परिसरातील स्वच्छता, रस्ते व बाजारपेठेचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, नदी परिसराचे व्यवस्थापन आणि मंदिर परिसरातील पायाभूत सुविधांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

 श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, दर्शनासाठी वेळ कमी लागावा व प्रतिक्षा कालावधी कमी व्हावा. मंदिर परिसर स्वच्छ व सुव्यवस्थित राहावा आणि विकासकामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत,असे निर्देश श्री.गौडा यांनी दिले.

0000

संबंधित पोस्ट

मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संपर्क व्यवस्था उभारणीवर भर- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मच्छिमारांना ५ सॅटेलाईट फोनचे वितरण

पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे· पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; उत्कृष्ट कार्यप्रणाली पुरस्काराने सन्मान..

रस्ते मोकळे, श्वास मोकळा! — ठाणेकरांनी आता पुढे काय करावे?— विजयकुमार कट्टी

मेळघाटात बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात ‘निसर्ग अनुभव’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद 33 वाघ आणि शेकडो वन्यजीवांचे पर्यटकांना दर्शन..

जालना जिल्ह्यासाठी 8 हजार 515 कोटींच्या वार्षिक पत आराखड्याचे प्रकाशन• पीक कर्ज, कृषी व एमएसएमई क्षेत्राला प्राधान्य• वार्षिक पत आराखड्यात बँकांची 101 टक्के उद्दिष्टपूर्ती

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नागपूर आयुक्त पदाची संदीप देशमुख यांनी घेतली शपथ