vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहतुकीच्या मार्गात बदल..

श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहतुकीच्या मार्गात बदल..

 

जालना, प्रतिनिधी : श्री गजानन महाराज संस्थान शेगाव या न्यासाची श्री ची पालखी पायदळवारी पालखी परंपरेनुसार पंढरपुर येथुन परतीच्या मार्गावर असुन या दिंडीमध्ये 700 ते 800 वारकरी सहभागी आहेत. ही पायी दिंडी ही दि. 7 ऑगस्ट 2026 रोजी जालना जिल्ह्यात प्रवेश करणार असुन दि. 9 ऑगस्ट 2026 ते दि. 10 ऑगस्ट 2026 पर्यंत जालना शहरात मुक्कामी राहून दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी जालना – नाव्हा मार्गे सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणाकडे प्रयाण करणार आहे. ही पायी दिंडी बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करतेवेळी जालना –नाव्हा-सिंदखेड राजा महामार्ग क्रमांक 753 सी वर मार्गक्रमण करणार आहे.

दिंडीचे दर्शन घेण्याकरीता मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असुन जड वाहनांच्या रहदारीमुळे क्षुल्लक बाबी वरुन विवादीत परिस्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पायी दिंडीतील भाविकांच्या व जनतेच्या सुरक्षिततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमनासाठी या मार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.

 पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधु यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 सी वरील जालना –नाव्हा-सिंदखेड राजा रोडवरील येणारी व जाणारी वाहतुक व्यवस्था दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 4.00 ते रात्री 8 वाजेपर्यंत खालील सर्व प्रकारच्या जड वाहतुकीस खाली दिलेल्या पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.

 अंबड चौफुली, मंठा चौफुली, कन्हैयानगर बायपास जालना- नाव्हा-सिंदखेड राजा मार्गे सुलतानपुर-मेहकरकडे जाणारी व येणारी जड वाहतुक पर्यायी मार्ग कन्हैयानगर जालना मार्गे देऊळगाव राजा-चिखलीकडे जातील व येतील.

 वरील मार्गाच्या जड वाहतुकीसाठी दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 4.00 ते रात्री 8 वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. असा आदेश पोलीस अधीक्षक यांनी पारीत केला आहे.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

शिवछत्रपती क्रडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळप्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश सन 2026-27 “

जिल्हाधिकाऱ्यांकडून चिया सिड उत्पादन, अन्नप्रक्रिया, मत्स्य व्यवसायाची पाहणी*उत्पादनाच्या ब्रँडींगवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

आर्थिक उन्नतीसाठी हिंदु खाटीक समाजासाठी महामंडळाच्या विविध योजना;अर्ज सादर करण्याचे आवाहन

नवी मुंबई महानगरपालिका -बेलापूर विभागातील प्रभाग क्र. 25,26,27,28 निवडणूक प्रक्रियेकरिता नियुक्त कर्मचा-यांना प्रशिक्षण-प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या कर्मचा-यांना नोटीसा – होणार कायदेशीर कारवाई

डोंगरी महोत्सव कालावधीत चोख पोलीस राहणार एसटीच्या जादा बसेस सोडणार- पालकमंत्री शंभूराज देसाई

बाळगंगा नदी धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासाठी शासन सकारात्मक – मंत्री मकरंद जाधव-पाटील