vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

समाजमाध्यमांमध्ये असत्य व अर्धसत्याचा महापूर; पत्रकारांनी ‘सत्य’ जनतेपर्यंत पोहोचवावे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा छत्तीसगड व बिहारच्या पत्रकारांनी घेतली राज्यपालांची भेट

समाजमाध्यमांमध्ये असत्य व अर्धसत्याचा महापूर; पत्रकारांनी ‘सत्य’ जनतेपर्यंत पोहोचवावे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा छत्तीसगड व बिहारच्या पत्रकारांनी घेतली राज्यपालांची भेट..

मुंबई, प्रतिनिधी : आज टेलिव्हिजन, डिजिटल व समाज माध्यमे आली असली तरी देखील वृत्तपत्रांची विश्वसनीयता अधिक आहे. रेडिओ आल्यानंतर दूरचित्रवाणी येण्यास मोठा कालावधी गेला. परंतु अलीकडे नवनवी माध्यमे झपाट्याने येत आहेत. समाज माध्यमांमध्ये आज असत्य व अर्धसत्य माहितीचा महापूर आला आहे. या पुरातून ‘सत्य’ वेगळे करून ते जनतेपर्यंत पोहोचवावे असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पत्रकारांना केले.

भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र भेटीवर आलेल्या छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागातील तसेच बिहार राज्यातील पत्रकार व माध्यम प्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी पत्र सूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागीय महासंचालक स्मिता वत्स शर्मा, छत्तीसगड व बिहार येथील विविध माध्यम समूहांचे पत्रकार व प्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते.

पत्रकारिता हा लोकशाहीतील महत्वाचा स्तंभ आहे असे सांगून क्षेत्रीय भेटी दिल्याने पत्रकारांना एखाद्या विषयाचे समग्र आकलन होण्यास मदत होते असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. पत्रकार हे शासन व समाजात सेतूचे कार्य करीत असतात. ‘स्तंभ’ हा नेहमी सरळ व मजबूत असला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

वृत्तांकन करीत असतानाच पत्रकारांनी नशामुक्त भारत अभियान, टीबीमुक्त भारत मोहीम आदी कार्यक्रमांसंदर्भात जनजागृतीचे काम करावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

शासन योजना तयार करते व त्यांची अंमलबजावणी करते. या योजनांबाबत जनजागृतीचे कार्य पत्रकारांनी करावे असे राज्यपालांनी सांगितले.

०००००

संबंधित पोस्ट

सेवासंकल्प अभियानांतर्गत देऊळगाव राजा पोस्ट ऑफिसमध्ये आधार सेवा उपलब्ध

गोंदिया जिल्ह्यातील कृषी विकासाच्या सर्व प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

उच्च शिक्षण विभागातील प्रश्नांना घेऊन मंत्र्यांची भेट आमदार सुधाकर अडबाले यांनी मागण्यांबाबत दिले मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन

जम्मू-काश्मीर पुनर्गठन (दुरुस्ती) विधेयक २०२५ आणि केंद्रशासित प्रदेश शासन (दुरुस्ती) विधेयक २०२५ या महत्त्वपूर्ण विधेयकांवर सखोल चर्चा आणि व्यापक सल्लामसलत सुरू केल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा अपराजिता सारंगी

जिल्ह्यासाठी 132 किलोलिटर केरोसीन मंजूर,तात्पुरत्या स्वरूपात वितरण सुरू- सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके-पलूस व तासगाव तालुक्यात वाटप गतिमान, इतर तालुक्यांतही लवकरच पुरवठा…

नागपूर येथील कळमना परिसरातील चिखली लेआऊटमध्ये भीषण आग