vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सेवाभावाचा संदेश देणारी सायकल रॅली उत्साहात संपन्न

सेवाभावाचा संदेश देणारी सायकल रॅली उत्साहात संपन्न

 

​अहिल्यानगर, प्रतिनिधी- श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त आयोजित भव्य सायकल रॅलीचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. या रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून करण्यात आली

​यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, बलदेव सिंग वाही, अमरप्रीत वाही, अमनदीप वाही, अश्विंदर मल्होत्रा, ब्रह्मा लोंगियानी, मोंटू लोंगियानी, इकजस नारंग, गुरजस नारंग, हरप्रीत नारंग, कुलबीर सिंग वाही, रविंदर सिंग नारंग आदी मान्यवर उपस्थित होते.

​जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सुरू झालेली ही रॅली सुरभी हॉस्पिटल, गुलमोहर पोलीस चौकी, श्रीराम चौक, प्रोफेसर कॉलनी चौक, प्रेमदान चौक, नायरा पेट्रोल पंप, दिल्ली गेट, मार्केट यार्ड, कोटला स्टँड आणि डीएसपी चौक मार्गे मार्गक्रमण करत भाई दया सिंह जी गुरुद्वारा येथे पोहोचली. तेथे या रॅलीचा समारोप करण्यात आला.

​या सायकल रॅलीमध्ये युवक-युवती, क्रीडाप्रेमी, सामाजिक संस्था, सायकलिंग क्लबचे सदस्य तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “निरोगी राहा, सायकल चालवा” तसेच “धर्म, एकता आणि सेवाभाव” असा संदेश देत ही रॅली अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.

00000

संबंधित पोस्ट

नांदेड जिल्ह्यास दस्त नोंदणीतून सरकारी तिजोरीत 221 कोटी 43 लाख जमा18 कार्यालयांमधून 65 हजार 674 दस्तांची नोंदणी’एक जिल्हा एक नोंदणी’व शनिवार-रविवार कार्यालय सुविधेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद,मध्यस्थांना फाटा देऊन थेट नोंदणी करण्याचे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील मुला-मुलींना शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी सुवर्णसंधी

विचारवेध’मध्ये 3 जुलै रोजी ऐरोलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात श्री.अविनाश धर्माधिकारी करणार राजर्षी शाहू महाराजांना वैचारिक अभिवादन

प्लास्टिक पुनर्रचनेसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – मंत्री पंकजा मुंडे ठाण्यातून ‘महा आर-पेट बॉटल व स्टिकर्स’ अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ

सायबर विश्वात मुलींना जाळ्यात ओढणाऱ्या विकृताला 5 वर्षे सक्तमजुरी-बनावट फेसबुक खात्याद्वारे अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मंगेश तांबेला ठाणे न्यायालयाचा दणका; 50 हजार रुपयांचा दंड पीडितांना देण्याचे आदेश…

मुंबई शहर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांतर्गत २० ठिकाणी मेळावे मुंबईतील जास्तीत जास्त उमेदवारांनी नावनोंदणी करावी

vishwatmaklokswamivarta