vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

सेवा संकल्प अभियानांतर्गत कवठेमहांकाळ येथे 7 ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिर

सेवा संकल्प अभियानांतर्गत कवठेमहांकाळ येथे 7 ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिर

 

 सांगली, प्रतिनिधी : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिक, युवक-युवती तसेच विविध सार्वजनिक मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वेच्छेने रक्तदान करावे, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय भोसेकर यांनी केले आहे.

अपघातग्रस्त, प्रसूतीतील माता, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्ण तसेच विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये रक्ताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते. रक्ताला कृत्रिम पर्याय उपलब्ध नसल्याने स्वेच्छेने केलेले रक्तदान अत्यंत महत्त्वाचे आहे. रक्तदानातून गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होऊन त्यांचे प्राण वाचविण्यास मदत होते.

 या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मिरज शासकीय रुग्णालयातील हिमोडायलिसिस सेवा ठरतेय हजारो रुग्णांसाठी जीवनदायी/आधार- चार वर्षांत १३,०७७ रुग्णांवर उपचार;  एचआयव्ही बाधितांसाठी स्वतंत्र यंत्राची सुविधा

यवतमाळ जिल्ह्यात 27 एप्रिल ते 19 मे 2026 दरम्यान विशेष कर्करोग निदान मोहीम…

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद१ हजार १०३ नागरिकांनी घेतला लाभ

महाबळेश्वर, वाई आणि खंडाळा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

३ ते १५ ऑगस्टदरम्यान जनजागृतीचे विविध उपक्रम; “अवयवदान-जीवनदानाचा सर्वोत्तम संकल्प” अभियानाला सुरुवात

सेवा संकल्प अभियानांतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

vishwatmaklokswamivarta