vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सेवा संकल्प अभियानांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथे महिला व बालविकास जनजागृती कार्यक्रम संपन्न

सेवा संकल्प अभियानांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथे महिला व बालविकास जनजागृती कार्यक्रम संपन्न

सातारा प्रतिनिधी :- महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय सातारा अंतर्गत राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र, सखी वन स्टॉप सेंटर आणि चाईल्ड लाईन यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल, सातारा येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

या कार्यक्रमात जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र, सखी वन स्टॉप सेंटर आणि चाईल्ड हेल्प लाईनच्या कामकाजाबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली. केंद्रामार्फत हिंसाग्रस्त व पीडित महिलांना पुरविल्या जाणाऱ्या मोफत सुविधा जसे की समुपदेशन, वैद्यकीय सेवा, पोलीस मदत, कायदेशीर सल्ला आणि तात्पुरत्या निवासाची सोय याविषयी मार्गदर्शन करण्यात आले

कार्यक्रमा दरम्यान कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, बाल संगोपन योजना, पोक्सो कायदा, अनाथ प्रमाणपत्र आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच मुलींनी मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम होणे कसे गरजेचे आहे, यावरही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

या जनजागृती कार्यक्रमास महिला सक्षमीकरण केंद्राच्या मृण्मयी जाधव, सोनाली देसाई, वन स्टॉप सेंटरच्या किरण साळुंखे यांच्यासह शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करावेॲपद्वारे प्रक्रिया सुलभ ; अनुदान बंद होऊ नये म्हणून प्रशासनाचे आवाहन

अर्धन्यायिक प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी मिरज तालुक्यातमहात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान- तहसिल कायर्यालय मिरज येथील सभागृहात 24 सप्टेंबर रोजी तर सर्व मंडळ अधिकारी यांच्या   कार्यालयात 21 सप्टेंबर 2026 रोजी लोकअदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या सुरक्षेचा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पथकाकडून आढावा!

हवामान विभागानं -पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट

रायगड जिल्ह्यात शेतकरी आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा,शेतरस्ते होणार मोकळे अन् खासगी जमिनींवरील हटणार ‘वन’ शिक्के….

कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री, ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकास देण्यास मंजुरी देण्यात आली. केंद्राच्या मान्यतेनंतर, सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे होणार आहे.