vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

सेवा संकल्प अभियानामध्ये असांसर्गिक कार्यक्रमांतर्गत कर्करोग तपासणी शिबिराला महिलांचा उत्तम प्रतिसाद

सेवा संकल्प अभियानामध्ये असांसर्गिक कार्यक्रमांतर्गत कर्करोग तपासणी शिबिराला महिलांचा उत्तम प्रतिसाद

नवी मुंबई प्रतिनिधी-

          राष्ट्रीय असांसर्गिक आजार (NCD) नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आज ९ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने सेवा संकल्प अभियानाचा भाग म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ३० वर्षांवरील स्त्रियांसाठी कर्करोग आजार तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

          या शिबिरास नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कुकशेत येथे महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी आरोग्य सभापती डॉ.जयाजी नाथ यांचेसमवेत भेट देत पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकूण 1609 स्त्रियांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली.

          वाढत्या आधुनिक जीवनशैलीमुळे कर्करोग (कॅन्सर) आजाराचे प्रमाण वाढत आहे. या आजाराचे वेळेत निदान करून रुग्णांना तात्काळ उपचार मिळवून देणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे रुग्णांची तपासणी करून समुपदेशन करण्यात आले.

           या अंतर्गत, मुख कर्करोग शिबिरामध्ये एकूण 1609 स्त्रियांच्या तोंडाची तपासणी करण्यात आली व व्यसनमुक्तीचे समुपदेशन करण्यात आले. यामध्ये एकूण 12 संशयास्पद केसेस आढळल्या असून त्यांना पुढील चाचणीसाठी संदर्भित केले आहे.

          स्तन कर्करोग महिलांमधील कॅन्सरचे वेळेत निदान करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत एकूण 1609 स्त्रियांची स्तनाचा कर्करोग तपासणी करण्यात आली असून एकूण 07 संशयास्पद केसेस आढळल्या आहेत व त्यांना पुढील चाचणीसाठी संदर्भित केले आहे.

           गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्या करीता एकूण 1609 स्त्रियांची प्राथमिक शारीरिक तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण 20 महिला रुग्णांना पुढील निदानासाठी रुग्णालयाकडे संदर्भित केले आहे.

           तपासणी दरम्यान ज्या नागरिकांमध्ये कर्करोगाची किंवा इतर आजारांची प्राथमिक लक्षणे आढळून आली आहेत, अशा सर्व संशयास्पद रुग्णांना पुढील सखोल तपासणीसाठी सार्वजनिक रुग्णालय नेरूळ येथे ओंकॉलॉजी ओपीडीला संदर्भित करण्यात आले आहे.

           कर्करोग हा पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात वेळेत ओळखला, तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. आजच्या शिबिराच्या माध्यमातून एकाच दिवसात 1609 नागरिकांपर्यंत आपण पोहोचू शकलो आहोत. घरोघरी भेट देणा-या ए.एन.एम. (ANM) यांच्याकडे महिलांनी कोणतीही लाज किंवा भीती न बाळगता आपल्या शरीरातील बदलांविषयी आणि कर्करोगाच्या प्राथमिक लक्षणांबाबत मोकळेपणाने बोलावे. आरोग्य हीच कुटुंबाची खरी ताकद आहे. त्यामुळे कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आरोग्य कर्मचा-यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे व जवळच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये जाऊन नियमित तपासणी करून घ्यावी असे आवाहन महापौर श्रीम.सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘जागतिक हिमोफिलिया दिन’ साजरा*28 रुग्णांची मोफत ‘इन्हीबिटर’ चाचणी, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठी आयुष्मान व वयो वंदना कार्ड आवश्यक

बाल स्वास्थ्य कार्यक्रमात 879 बालकांना जीवदान *4 हजार 547 इतर शस्त्रक्रिया यशस्वी…

आदर्श जीवनशैली, पौषक आहार, औषधी हीच क्षयरोग मुक्तीची त्रिसुत्री – आरोग्य उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड

हरीसाल आरोग्य केंद्राच्या पथकाकडून मातेला जीवनदान*प्रसूतीनंतरचा गंभीर रक्तस्त्राव रोखण्यात यश…

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवात आरोग्य जनजागृतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड‘लोकसंवाद-२०२६’ व ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान’ : राजर्षी शाहू गणेशोत्सव मंडळात आरोग्य तपासणी व समुपदेशन

vishwatmaklokswamivarta