vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

सेवा संकल्प अभियान अंतर्गत आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

सेवा संकल्प अभियान अंतर्गत आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

जालना, प्रतिनिधी: सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जालना यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ जिल्ह्यात विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आज दि. 16 रोजी बदनापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वाकुळणी येथे 48 किशोरवयीन 14 वर्ष पूर्ण व 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना एच पी व्ही लस देण्यात आली. मंठा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ढोकसाळ येथे 11 किशोरवयीन 14 वर्षे पूर्ण व 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना एचपीव्ही लस देण्यात आली. घनसांवगी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य कुंभार पिंपळगाव येथे 05 किशोरवयीन 14 वर्ष पूर्ण व 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना एच पी व्ही लस देण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र शहागड तालुका अंबड येथे 02 किशोरवयीन 14 वर्ष पूर्ण व 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना एच पी व्ही लस देण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र पीर पिंपळगाव ता.जि. जालना येथे 03 किशोरवयीन 14 वर्ष पूर्ण व 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना एच पी व्ही लस देण्यात आली. ज्यामुळे गर्भाशयाच्या मुख कर्करोगापासून संरक्षण मिळते.

यावेळी किशोरवयीन मुलींच्या आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन एचपीव्ही लसीकरणाची माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे मुलींमध्ये लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होत आहे. लसीकरणाबाबत मार्गदर्शन करून लस देण्यात आली.

या उपक्रमातून किशोरवयीन मुलींच्या आरोग्य संरक्षणाला प्राधान्य देण्यात येत असून, ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक माहिती व सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

****

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर” अंतर्गत आयोजित आरोग्य शिबीरांचा 6 हजारहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात 2 हजार 786 दिव्यांग बांधवांनी केली आरोग्य तपासणी आणि साहित्य नोंदणी; लवकरच होणार साहित्य वाटप शिबीर

आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठी आयुष्मान व वयो वंदना कार्ड आवश्यक

एचपीव्ही लस सुरक्षित; अफवांना बळी पडू नका-डॉ. अमोल गीते यांचे आवाहन

अवयवदान पंधरवड्यानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात सामूहिक अवयवदान प्रतिज्ञा

जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण पंधरवड्याचे आयोजन