vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

११० गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मोफत वाटप

११० गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मोफत वाटप

ठाणे – प्रतिनिधी –

श्रीमती गुजना हिंदी/इंग्रजी हायस्कूल आझादनगर, चितळसर मानपाडा, ठाणे या शाळेच्या ११० गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.

महेश बंशीधर अग्रवाल फाऊंडेशन’ आणि ‘राजरानी फाऊंडेशन’ या दोन प्रसिद्ध सेवाभावी संस्थेतर्फे हे गणवेश देण्यात आले. ‘महेश बंशीधर अग्रवाल फाऊंडेशन’चे अध्यक्ष, वरिष्ठ समाजसेवक महेश अग्रवाल आणि ‘राजरानी फाऊंडेशन’ची अध्यक्षा रानी पांडेय यांनी काही दिवसांपूर्वी मागसवर्गीय क्षेत्रात असलेले ४७ वर्ष जुनी श्रीमती गुजना हिंदी/इंग्रजी हायस्कूल या शाळेत सदिच्छा भेट दिली होती.

या भेटी दरम्यान त्यांना बरेच गरजू विद्यार्थी आढळून आले होते. या विद्यार्थ्यांची अर्थिक परिस्थिती पाहून असे ११० मुली/मुले यांना गणवेश देण्याचे ठरवले होते. गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपच्या वेळी शाळेतर्फे शिप्रा डे, अभय पांडेय, रामकेर शर्मा, राजेश पांडेय आणि साधना मिश्रासह अनेक शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

एकुण ११० मुली/मुलांना मोफत गणवेश वाटपानंतर संस्थेतर्फे संतोष पांडेय यांनी महेश अग्रवाल आणि राणी पांडेय यांचे विशेष आभार मानले. या वेळी मोठ्या संख्येने शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.-

संबंधित पोस्ट

क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आज लातूर–हैदराबाद महामार्गावर लामजना पाटीजवळ रास्ता रोको आंदोलन …

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहचे उत्साहात उद्घाटन संपन्न

वरळी येथील दूरदर्शन केंद्रात प्लॅनेट रीड ‘मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा’चा शुभारंभ माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला

vishwatmaklokswamivarta

कोकण विभागातील पहिला ‘अमृत आनंद मेळा वरसोली अलिबाग येथे उत्साहात संपन्न

स्वीप समितीच्या वतीने ‘मनपा ऑन एअर’ उपक्रम-विविध रेडिओ वाहिन्यांवरून प्रेरक मुलाखती व संदेश प्रसारित…

vishwatmaklokswamivarta

जागतिक हत्ती दिनानिमित्त भारताच्या समृद्ध पर्यावरणीय वारशाला सलाम..