vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

अहिल्यानगर येथे ४३० खाटांच्या शासकीय रुग्णालयासाठी ९८१ पदनिर्मितीस राज्य शासनाची मान्यता.ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणारआरोग्यसेवेचा आणि त्या अनुषंगाने स्थानिक रोजगार संधीचा विस्तार…सभापती प्रा राम शिंदे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी…

अहिल्यानगर येथे ४३० खाटांच्या शासकीय रुग्णालयासाठी ९८१ पदनिर्मितीस राज्य शासनाची मान्यता.ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणारआरोग्यसेवेचा आणि त्या अनुषंगाने स्थानिक रोजगार संधीचा विस्तार…सभापती प्रा राम शिंदे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी…

 

मुंबई,  (प्रतिनिधी / वार्ताहर)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न ४३० खाटांच्या रुग्णालयासाठी आवश्यक पदनिर्मितीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्या अन्वये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला असून रुग्णालयाच्या कार्यक्षम संचालनासाठी एकूण ९८१ पदांची निर्मिती टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. विधान परिषद सभापती मा प्रा राम शिंदे यांनी यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता

राज्यातील निमशहरी, ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे तसेच वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढविणे या उद्देशाने राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथे १०० विद्यार्थी प्रवेशक्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.

शासन निर्णयानुसार रुग्णालयासाठी नियमित स्वरूपातील गट-अ, गट-ब व गट-क मधील ५१५ पदे तसेच बाह्यस्त्रोताद्वारे (आउटसोर्सिंग) ४६६ मनुष्यबळ सेवा अशा एकूण ९८१ पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. ही पदे चार टप्प्यांत भरली जाणार असून पहिल्या टप्प्यातील पदनिर्मिती तत्काळ करण्यात येणार आहे.

या पदनिर्मितीमुळे वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता, लिपिक, वाहनचालक तसेच विविध सहाय्यक व तांत्रिक पदांसह अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. रुग्णालयाच्या सर्व विभागांचे सक्षम मनुष्यबळ उभारून नागरिकांना अधिक प्रभावी व दर्जेदार आरोग्यसेवा देण्यास मदत होणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात असून वैद्यकीय शिक्षण, आरोग्यसेवा आणि स्थानिक रोजगारनिर्मितिच्या संधी यांना यामुळे मोठी चालना मिळणार आहे

0000

 

संबंधित पोस्ट

स्वच्छता ही सेवा’ अभियानात ईटीसी केंद्रामध्ये विशेष मुलांची दंत तपासणी

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर, वाई आणि खंडाळा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

इटीसी दिव्यांग शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील विशेष मुलांसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न

सशक्त बालक हीच देशाची खरी संपत्ती;संपूर्ण समाज निरोगी व सशक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ- सुदृढ बालकांसाठी मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत टास्क फोर्सने अभ्यास दौरा करून अहवाल द्यावा- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप*