vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात ११वा आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात ११वा आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा

 

सातारा प्रतिनिधी- आयुष विभागामार्फत स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात ११ वा आयुर्वेद दिवस आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सदर दिवसाची संकल्पना निरोगी उद्यासाठी आयुर्वेद अशी होती तसेच 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 ह्या कालावधीत सेवा संकल्प अभियानांतर्गत पोषण माह याचेही आयोजन नर्सिंग कॉलेज सातारा तसेच जिल्हा रुग्णालय सातारा यांच्यातर्फे करण्यात आले होते.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल जाधव, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अतुल लिपारे, डॉ. उल्का झेंडे, डॉ. चंद्रकांत काटकर, डॉ. अरुंधती कदम, डॉ.स्मिता लोंढे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने तसेच धन्वंतरी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी डॉ.राहुल जाधव यांनी निरोगी जीवनासाठी आयुर्वेद महत्वाचा असून त्यात सांगितलेल्या दिनचर्या, आहार, विहार इत्यादी संकल्पनाचे पालन दैनंदिन जीवनात केले पाहिजे, असे प्रतिपादन केले तसेच आयुर्वेद दिवस हा दरवर्षी देशभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असल्याचे नमूद केले. आयुष विभाग जिल्हा रुग्णालय येथे बरेच रुग्ण उपचार घेत असून अनेकांना आयुष उपचार पद्धतीचा लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पोषण माह याचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या अंतर्गत गर्भिणी अवस्थेत उपयोगी पडणार आहार, संतुलित आहार, आयुर्वेदिक पाककृती, प्रसूती पश्चात घ्यायचा आहार आणि पाककृती यांचे स्टॉल नर्सिंग कॉलेज मधील विद्यार्थी आणि परिचारिका यांनी मांडले होते आणि उपस्थित रुग्णांना पोषक आहाराविषयी माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिथुन पवार, जिल्हा आयुष अधिकारी यांनी तर सूत्रसंचालन डॉ. संजीवनी शिंदे यांनी केले. डॉ. विनोद तांबवेकर यांनी आभार मानले.

०००००

संबंधित पोस्ट

आपत्ती परिस्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी रूग्णालय व्यवस्थापनास दिलेले प्रशिक्षण उपयुक्त – जिल्हाधिकारी अशोक काकडे – मेहता हॉस्पिटलमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

लंपी आजारावर खासदार डॉ.कल्याण काळे यांची तात्काळ हस्तक्षेपाची मागणी    जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या संकटावर भावनिक आवाहन

vishwatmaklokswamivarta

श्री गणेशा आरोग्याचा अभियान २.०’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४८ हजार २९६ नागरिकांची आरोग्य तपासणी**६५० आरोग्य शिबिरांचे आयोजन; ५०६ रुग्ण पुढील उपचारासाठी संदर्भित**१० हजार ८९४ रक्ततपासण्या; ६९० जणांचे रक्तदान, २ हजार ३२ नागरिकांची आभा कार्डसाठी नोंदणी*

vishwatmaklokswamivarta

*उंडाळे व काशीळ येथे0आरोग्य शिबिराचे आयोजन* 

vishwatmaklokswamivarta

बंधपत्रित सेवा पूर्ण करण्याच्या धोरणास वैद्यकीय शिक्षण विभागाची स्थगिती

सिरोंचा येथे दिव्यांग तपासणी शिबिर उस्फुर्त प्रतिसाद ; ८१६ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी  कडक ऊन अन लाभार्थ्यांचा ओघ… तरीही थकली नाही डॉक्टरांची टीम;