vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

थॅलेसेमिया मुक्तीसाठी प्रत्येक घटकाचा सहभाग वाढवा– आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरमुंबईतील आरोग्य भवनात बैठक संपन्न

थॅलेसेमिया मुक्तीसाठी प्रत्येक घटकाचा सहभाग वाढवा– आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरमुंबईतील आरोग्य भवनात बैठक संपन्न

परभणी, प्रतिनिधी: थॅलेसेमिया या अनुवंशिक रक्तविकाराच्या प्रतिबंधासाठी जनजागृती, वेळेवर तपासणी आणि योग्य समुपदेशनाला व्यापक स्वरूप देऊन समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग वाढवावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले

थॅलेसेमिया प्रतिबंधाबाबत मुंबई येथील आरोग्य भवनात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. नागरिक, विद्यार्थी, गर्भवती महिला तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये थॅलेसेमियाबाबत आवश्यक माहिती पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विवाहपूर्व तपासणी व समुपदेशनाला प्रोत्साहन देण्याबरोबरच एचपीएलसी व इलेक्ट्रोफोरेसिस चाचण्यांबाबत जनजागृती करण्यावर त्यांनी भर दिला

शाळा-महाविद्यालयांमध्ये थॅलेसेमियाविषयी जनजागृतीपर उपक्रम नियमितपणे राबवावेत. तसेच रक्तदान शिबिरांना चालना देऊन गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

थॅलेसेमियाचे वेळेवर निदान, योग्य उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविल्यास या आजाराचे प्रमाण कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे आरोग्य विभागासोबतच शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, पालक, विद्यार्थी आणि नागरिकांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले.

बैठकीस आयुक्त संजय काटकर, आयुक्त (शहरी) डॉ. सुनील भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसचिव राजश्री सारंग, राज्य समन्वयक लक्ष्मीकांत पिंपळगांवकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे समन्वयक चेतन भोजकर उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्व मंडळांचे उपसंचालक बैठकीत सहभागी झाले.

***

संबंधित पोस्ट

टीबी मुक्त ग्रामपंचायतींना 28 कास्य, 136 रोप्य मानांकनाने सन्मानित  टीबी मुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहा- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे..

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचा शुभारंभ

आरोग्य विभागातील ७ आरोग्य सहाय्यक यांना आरोग्य सेवक या पदोन्नतीचा लाभ

जिल्हा रुग्णालयात #हृदयरोग निदान व #आरोग्यशिबीर संपन्न शिबिरात 181 बालकांची तपासणी तर 75 पात्र बालकांवर किम्स हॉस्पिटल ठाणे येथे लवकरच मोफत हृदय शस्त्रक्रिया                                                                                  

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय…

श्री गणेशा आरोग्याचा’ अंतर्गत जिल्ह्यात १ हजार ५७४ आरोग्य शिबिरे; ८९ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी

vishwatmaklokswamivarta