vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

गणेशोत्सवाच्या मंचावरून ‘लोकसंवाद-२०२६’; नांदुरा येथे आरोग्य विषयक जनजागृती

गणेशोत्सवाच्या मंचावरून ‘लोकसंवाद-२०२६’; नांदुरा येथे आरोग्य विषयक जनजागृती

बुलढाणा, प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या नागरिकांशी संवाद साधत शासनाच्या आरोग्यविषयक योजना व सुविधांची माहिती देण्यासोबतच आरोग्य तपासणी आणि समुपदेशनाचा उपक्रम नांदुरा येथील आदिशक्ती गणेशोत्सव मंडळात राबविण्यात आला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकसंवाद-२०२६’ या विशेष जनजागृती उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, बुलढाणा यांच्या पुढाकाराने २० सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, या कालावधीत मोठ्या संख्येने नागरिक गणेश मंडळांमध्ये एकत्र येतात. या पार्श्वभूमीवर शासनाच्या लोककल्याणकारी योजना, उपक्रम व निर्णयांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम राबविण्यात येत आहे. उत्सवाच्या आनंदासोबत नागरिकांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे

कार्यक्रमादरम्यान नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्यविषयक आवश्यक मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजना, उपलब्ध आरोग्य सुविधा आणि त्यांचा लाभ घेण्याची प्रक्रिया याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.

शासकीय योजनांची माहिती ही लाभाची पहिली पायरी आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कुटुंबाच्या आरोग्याबाबत जागरूक राहून उपलब्ध आरोग्य सुविधा व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या उपक्रमाला आदिशक्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती आणि शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम प्रभावी ठरला.

00000

संबंधित पोस्ट

गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात जिल्हास्तरीय समित्यांचे स्वरूप तयार करण्याचा निर्णय -डॉ. नीलम गोऱ्हे

समुपदेशनाने होणार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची विनंती बदली.* मा. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

आदर्श जीवनशैली, पौषक आहार, औषधी हीच क्षयरोग मुक्तीची त्रिसुत्री – आरोग्य उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड

नेत्रदान पंधरवड्यानिमित्त जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

एचपीव्ही लसीकरणाचे महत्व प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- एचपीव्ही लसीकरणाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका, शंका असल्यास अधिकृत वैद्यकिय  व्यवसायिकांचा सल्ला घ्या- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 28 जून 2026 रोजी..

ओटी भरण कार्यक्रमानिमित्त वाई तालुक्यातील 925 गरोदर मातांची आरोग्य तपासणी

vishwatmaklokswamivarta