vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा प्रतिनिधी सातारा जिल्हा परिषद व त्या अंतर्गत 11 पंचायत समित्यांसाठी उद्या 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदान प्रक्रियेत सर्व मतदारांनी तसेच नव मतदार युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

मतदान पथके प्रत्येक मतदान केंद्रावर पोहचली असून या केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मतदारांना मतदान केंद्रावर देण्यात येणाऱ्या सुविधा परिपूर्ण करण्यात आलेल्या आहेत.

राज्य घटनेने दिलेला मतदानाचा मौलीक अधिकार प्रत्येक मतदाराने बजावला पाहिजे. तसेच नागरिकांनी मतदान करुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणामध्ये सहभागी झाले पाहिजे. मतदारांच्या सहभागामुळेच योग्य लोकप्रतिनिधी निवडणे शक्य होणार आहे. मतदानाच्या टक्केवारीत सातारा जिल्हा परिषद अव्वल राहील यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे- गोरक्ष लोखंडे- इस्लामपूर, आष्टा येथील बैठकीत निर्देश- आर्थिक दुर्बल, अनुसूचित जाती जमातीसाठीच्या निधीचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास शासन सकारात्मक – शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

लातूर जिल्हा रुग्णालय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन,लातूर येथे ५०० खाटांचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारणार-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• रुग्णालय इमारतीसाठी निधी कमी पडू देणार नाही

लागवडीखालील पोटखराब जमिनीची नोंद ॲग्रिस्टॅक योजनेत होणार !कोणतीही बाधा नाही ; शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करुन घ्यावाजिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील चित्रपटांची घोषणा इफ्फी 2025 मध्ये प्रतिष्ठित ‘सुवर्ण मयूर’ पुरस्कारासाठी पंधरा चित्रपट स्पर्धेच्या रिंगणात

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक *प्रयागराज कुंभमध्ये हिंदु जनजागृती समितीची ‘हिंदू एकता पदयात्रा’ *कुंभमेळ्यामध्ये घुमला ‘हिंदु राष्ट्रा’चा जयघोष!

vishwatmaklokswamivarta