vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२५’ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२५’ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

सातारा, प्रतिनिधी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2025 ते 31 डिसेंबर, 2025 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च, 2026 असा आहे.

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.पुरस्कारांची माहितीअ.क्र. पुरस्काराचे नाव पारितोषिक1. अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय) रु.1 लाख रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)2. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)3. अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)4. बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)5. मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर) 51 हजार रुपये,मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

6. यशवंतराव चव्हाण पुरस्कार,शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)7. पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर) 51 हजार रुपये,मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)8. तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)9. केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

10. समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)11. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

12. पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)विभागीय पुरस्कार

13. दादासाहेब पोतनीस पुरस्कार, (नाशिक विभाग)51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र,या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)

14. अनंतराव भालेराव पुरस्कार, (छत्रपती संभाजीनगर आणि लातूर विभाग) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

15.आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)16. नानासाहेब परूळेकर पुरस्कार, (पुणे विभाग) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)17. शि.म.परांजपे पुरस्कार, (कोकण विभाग) 51 हजार रुपय(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)18. ग.गो.जाधव पुरस्कार, (कोल्हापूर विभाग) 51 हजाररुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)19. लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, (अमरावती विभाग) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)20. ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, (नागपूर विभाग) 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

संबंधित पोस्ट

देशाची अन्नसुरक्षा, आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची – राज्यपाल जिष्णू देव वर्मा,महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३९ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित-शाश्वत शेतीसाठी सर्व घटकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इंडियन ऑईल’च्या सीएसआर उपक्रमातून कूपर रुग्णालयास बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध सरकारी आणि महापालिका रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 32 गोविंदा जखमी झाले आहेत.यापैकी 28 गोविंदांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला असून, 4 गोविंदांवर सध्या उपचार सुरू आहेत.

vishwatmaklokswamivarta

पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात” 347 उमेदवारांची प्राथमिक निवड

जालना शहरातील राजपूतवाडी येथील जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर येण्यामागील कारण स्पष्ट• नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये