vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

काँग्रेसने संसदेच्या प्रतिष्ठेचा अवमान केल्याने जालन्यात भाजप आक्रमक, जोरदार निषेध आंदोलन संसदेचा अवमान हा देशाचा अपमान – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

काँग्रेसने संसदेच्या प्रतिष्ठेचा अवमान केल्याने जालन्यात भाजप आक्रमक, जोरदार निषेध आंदोलन

संसदेचा अवमान हा देशाचा अपमान – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

 

जालना, (प्रतिनिधी) : 12 मार्च 2026 रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पीय बजेटचे कामकाज सुरू असताना काँग्रेस नेते खा. राहुल गांधी व काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षातील काही खासदारांनी संसद परिसरात चहा-बिस्कीटसह चायपार्टी आयोजित केली. संसद ही देशाची सर्वोच्च लोकशाही संस्था असताना अशा प्रकारचे कृत्य करणे हे अत्यंत दुर्दैवी असून संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे आहे. तसेच संसदीय नियम व अध्यक्षांच्या आदेशांची अवहेलना करणारी आहे. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, जालना च्या वतीने शनिवार दिनांक 14 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6:10 वाजता भाजपा जिल्हा कार्यालय, जालना येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.

 

यावेळी बोलताना भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे म्हणाले की, संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना कॉंग्रेस पक्षातील खासदारांनी संसद परिसरात चायपार्टी आयोजित करणे हे संसदीय परंपरेला धरून नाही. लोकशाही संस्थांची प्रतिष्ठा राखणे ही सर्व लोकप्रतिनिधींची जबाबदारी असताना अशा प्रकारच्या कृत्यामुळे संसदेची मर्यादा भंग होते. संसदेचे नियम व अध्यक्षांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून केलेले हे कृत्य निषेधार्ह असल्याचेही त्यांनी नमूद केले. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी भारतीय जनता पार्टी, जालना यांच्या वतीने करण्यात आली.

 

तसेच देशातील जनतेमध्ये चुकीचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या विकासासाठी सातत्याने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

यावेळी जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, माजी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, रामेश्वर भांदरगे, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, जेष्ठ कार्यकर्ते प्रभुलाल गोमतीवाले, शीतलप्रसाद पांडे, नारायण पवार, मंडळ अध्यक्ष अमोल धानुरे, संजय डोंगरे, सुनील खरे, महेश निकम, संजय आटोळे, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, वसंत शिंदे, गोविंद ढेंबरे, शिवप्रकाश चितळकर, गोवर्धन कोल्हे, देविदास देशमुख, राजेश जोशी, एससी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल सरकटे, नगरसेवक रमेश गौरक्षक, कल्याण भदनेकर, राजाराम जाधव, जगदीश येनगुपटला, गजानन खरात, बाबा उगले, शाम उगले, नागेश अंभोरे, विष्णू राठोड, राहुल यादव आदीसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस व संबंधित खासदारांविरोधात घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त केला.0000

संबंधित पोस्ट

माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केली जायकवाडी समांतर पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी…

एमपीएससीकडून ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्द

नाशिकमधील नवीन रिंग रोडचे व साधूग्रामचे काम त्वरित पूर्ण करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची पायाभूत सुविधांची सर्व कामे दर्जेदार व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश  नाशिक – त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 आढावा बैठक

भारतीय तटरक्षक दलआणि गुजरात दहशतवाद विरोधी पथक यांनी संयुक्तपणे एक मोठी कारवाई 1800 कोटी रुपयांच्या किमतीचे तीनशे किलो ड्रग्स जप्त…

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (MCED) तर्फे ‘इम्पोर्ट एक्सपोर्ट’ प्रशिक्षण