vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराजस्व अभियानात सर्व विभागाने पुढाकार घ्यावा- संजय केनेकर.

महाराजस्व अभियानात सर्व विभागाने पुढाकार घ्यावा- संजय केनेकर.

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सर्वसामान्य नागरिकांना,शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा ,यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराअंतर्गत सर्व विभागाने विविध योजनांचा लाभ देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन विधान परिषद सदस्य तथा महाराजस्व शिबिराचे राज्यस्तरिय समिती सदस्य संजय केनेकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यात शिबिराची अंमलबजावणी आणि नियोजन याबाबतचे माहिती सादर केली. सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड,उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे ,कन्नड उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसीलदार या बैठकीस दूरदृष्यप्रणालीद्वारे . उपस्थित होते.

महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत सातबारा वितरण, सेतू सुविधा केंद्र मार्फत विविध दाखले आणि प्रमाणपत्र, डिजिटल सातबारा ,पानंद रस्ते, कृषी विभागांतर्गत शेती अवजारांचे वाटप, आरोग्य विभागाच्या अंतर्गत आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड ,एसटी बसेसचा लाभ घेणाऱ्यां ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड, इतर विभागांच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनासाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र या समाधान शिबीर अंतर्गत वितरित करण्यात येत यावे.या समाधान शिबीर अंतर्गत ज्या ठिकाणी समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे त्याबाबतची पूर्वकल्पना लोक प्रतिनिधी ,शेतकरी ,शेतमजूर व सर्वसामान्य लोकांना व्हावी यासाठी ग्राम स्तरावर महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत जाणीव जागृती होणे आवश्यक आहे .जिल्ह्यात झालेल्या कामाचे स्वरूप प्रगतीपथावर असून त्या बाबत जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन श्री केनेकर यांनी केले. नागरिकांना शासकीय सेवेचा लाभ तात्काळ आणि लोकाभिमुख पद्धतीने मिळावा यासाठी यंत्रणांनी समन्वय ठेवून सर्व विभागाच्या योजनांचा लाभ द्यावा . जिल्हा , तालुका आणि ग्राम स्तरावर शिबिर यशस्वीपणे राबवावे असे निर्देश विधान परिषद सदस्य संजय केनेकर यांनी दिले.

 अभियानातील फलनिष्पत्ती. आजपर्यंत ८४ शिबिराचे आयोजन करण्यात आले.यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत एक खिडकी योजनेअंतर्गत २३६०प्रकरण निकाली,विविध प्रमाणपत्राचे वितरण यामध्ये ३१०२ , प्रमाणपत्र वितरण केले,आठ अ उताराचे प्रमाणपत्र वितरणमध्ये २२५८, तसेच डिजिटल सातबारा २५९० , वितरण, सातबाराची दुरुस्त३८९, फेरफार निकाली करण्यात आले,१०९३ गाव दप्तर अद्यावतीकरण- १४ प्रकरणे, अकर्षक परवाने -१९. अशाच प्रकारच्या लाभ देण्यासाठीचे शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

रायगड जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष संपर्क नंबर व व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरु

डॉ. संपदा मुंडे प्रकरणात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश,सातारा जिल्हा रुग्णालयाने दोन वर्षांचा विशाखा समिती अहवाल सादर करावा; पोलीस अधीक्षक कार्यालयाने चार्जशीट वेळेत दाखल करावे

vishwatmaklokswamivarta

अखिल भारतीय साहित्य संमेलनात मुंबई मराठी पत्रकार संघाचा स्टॉल पुस्तकाचे प्रदर्शन…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय मतदार दिन शनिवारी(दि.२५);विविध कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

आदिशक्ती अभियानाचा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आढावा सर्व ग्रामपंचायतींनी शंभर टक्के सहभाग घेण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांची लाईफ लाईन महत्त्वाची बातमी; रविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर लोकल फेऱ्यांमध्ये बदल होणार