vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

15 एप्रिल रोजी तीसऱ्या विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित

15 एप्रिल रोजी तीसऱ्या विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित

नांदेड प्रतिनिधी:- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत अभियान स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान” बाबत कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एप्रिल 2026 मध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळा घेण्यात येणार आहेत. यामध्ये पहिली डिजिटल शेतीशाळा 1 एप्रिल तर दुसरी डिजिटल शेतीशाळा 8 एप्रिल रोजी रोजी संपन्न झाली असून तीसरी शेतीशाळा बुधवार 15 एप्रिल रोजी आयोजित केली आहे.  या डिजिटल शेती शाळांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा. तसेच प्रत्येक गावातील शेतक-यांनी डिजिटल शेतीशाळेसाठी आपल्या घरातून ऑनलाईन उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

पाणी फाउंडेशन द्वारे संचलित डिजिटल शेती शाळा हे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे. जिथे तज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त आणि पीक निहाय उत्तम पद्धतींचे मार्गदर्शन झूम आणि युट्युबच्या माध्यमातून दिले जाते.

1 व 8 एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या डिजिटल शेतीशाळेच्या पहिल्या व दुसऱ्या सत्रात शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता पुढील सत्र भाग ३ मध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): सापळा पिके, पक्षी थांबे,चिकट सापळे ,मित्र कीटक, लिंबोळी आणि दशपर्णी अर्कचा वापर बाबत नियोजित १५ एप्रिल २०२६ रोजी मार्गदर्शन मिळणार आहे.  तरी शेतकरी बंधू-भगिनी, शेतकरी गट, FPOs आणि महिला बचत गटांनी या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. चला, तर मग हवामान बदलाला सामोरे जात, आपल्या शेतीला अधिक शाश्वत आणि समृद्ध बनवू या.

 सदरील शेतीशाळेस कृषि विभाग अंतर्गत उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, समूह सहाय्यक, कृषी ताई व कृषी सखी तसेच पशुसंवर्धन विभाग अंतर्गत पशुसंवर्धन विकास अधिकारी, पशुसंवर्धन पर्यवेक्षक व पशुसखी हे उपस्थित राहतील. तसेच प्रत्येक गावात एका मध्यवर्ती ठिकाणी शेतकरी एकत्रित उपस्थित राहतील असे नियोजित आहे.

शेती शाळा नियोजित बुधवार 15 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी ७.३० वाजता सुरू करण्यात येणार आहेत. तसेच सदर डिजिटल शेतीशाळा खाली दिलेल्या यु ट्यूब चॅनेल द्वारे आपण डिजिटल शेती शाळा बघू शकता- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प- https://www.youtube.com/live/mEgTBeO_yP8?si=0M2ezKHv6OmCUOWfकृषी विभाग महाराष्ट्र शासन- https://www.youtube.com/live/2JKciiYL0I?si=l21CrYi7oyDEk3Xu

पाणी फाउंडेशन- https://www.youtube.com/live/nF-20hUunAo?si=iE-MYbPJ21SCCWiH

00000

संबंधित पोस्ट

पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर दिल्यामुळे भारताच्या दळणवळण खर्चात मोठी कपात झाली आहे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी मोठा निधी, मेट्रो आणि रेल्वे प्रकल्पांना मिळाली गती

vishwatmaklokswamivarta

महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

vishwatmaklokswamivarta

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे; महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईकरांचे आभार बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन 

अभियानाचा उपयोग गावाच्या विकासासाठी करावा- विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल

vishwatmaklokswamivarta

9 जूनला डाक अदालतीचे आयोजन