vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी बेरोजगार उमेदवारांनी जागेवर निवड संधीचा लाभ घ्यावा

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी बेरोजगार उमेदवारांनी जागेवर निवड संधीचा लाभ घ्यावा

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,रायगड-अलिबाग कार्यालयातर्फे दि.30 जून 2026 रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,रायगड-अलिबाग वैभव निवास, भंडार आळी,चेंढरे, अलिबाग येथे जागेवर निवड संधी /Placement Drive आयोजित करण्यात आले असून जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी या जागेवर निवड संधी /Placement Drive चा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्र, रायगड-अलिबागचे प्र.सहायक आयुक्त श्रीकांत कोकाटे यांनी केले आहे.

   जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील विविध रिक्तपदांच्या/ॲप्रेंटिसशिपची भरतीसाठी जागेवर निवड संधी /Placement Drive आयोजित केला आहे. या जागेवर निवड संधी /Placement Drive मध्ये नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दीतीने अर्ज करता येईल. प्रथम https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावरील Employment- Job Seeker (Find A Job)- Job Seeker Login या क्रमाने जाऊन आपल्या कडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली शैक्षणिक माहीती अद्ययावत करून त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शनमधून आपला जिल्हा निवडून जिल्ह्याच्या नावावरील Vacancy Listing-I Agree व दिसणाऱ्या विविध पदांना आपल्या शैक्षणिक अर्हते प्रमाणे ऑनलाईन अप्लाय करावे

       जागेवर निवड संधी/Placement Drive मध्ये सहभागी होणाऱ्या नवउद्योजकांकरिता महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्ज योजनां ‍विषयाची माहिती दिली जाईल. तसेच जिल्ह्यातील कार्यरत महामंडळ जागेवर निवड संधी /Placement Drive मध्ये आपल्या विविध कर्ज योजनासह सहभागी होत आहेत. आपल्याला कर्ज योजनेबद्दल माहिती व मार्गदर्शन याद्वारे दिले जाईल. जेणे करून स्वयंरोजगार करणाऱ्या इच्छूक उमेदवारांना योजनेचा लाभ मिळू शकेल. जिल्ह्यात राबविले जाणारे मोफत कौशल्य प्रशिक्षणाची माहिती व जागेवर निवड संधी/ Placement Drive मध्ये केले जाणार आहे. तसेच जागेवर निवड संधी /Placement Drive मधील रिक्तपदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करताना काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 व या कार्यालयाचे लिपिक टंकलेखक श्री.म.भा.वखरे,यांच्या 9421613757 या भ्रमध्वनी वर संपर्क साधावा.

०००००००

संबंधित पोस्ट

पालक सचिव डॉ. गोविंदराज यांचा रायगड दौरा  जिल्हा परिषद मॉडेल स्कूल वायशेतला भेट..

vishwatmaklokswamivarta

पोलीस दलाची कार्यक्षमता व बौद्धिक वाढीसाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार – केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय स्पर्धेत सर्वोच्च विजेता ठरला तेलंगणा संघ; अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यातील स्पर्धांची सांगता

अवयवदान’ ही मानवतेची व सामाजिक बदलाची चळवळ व्हावी- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

अलिबाग-वडखळ मार्गावर शनिवार-रविवारी जड वाहनांची वाहतूक बंद पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा निर्णय..

राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम,निवडणूक प्रक्रियेतील यश सामुहिकप्रयत्नांमुळेच- विभागीय आयुक्त दिलीप गावडे

vishwatmaklokswamivarta

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा;परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णयशैक्षणिक संस्थांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन