vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आयुष्यमान भारत, हात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कार्ड अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

आयुष्यमान भारत, हात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कार्ड अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्ड व महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्ड हे आरोग्य सेवेचा मोठा आधार आहे. त्यासाठी हे कार्ड अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, जिल्हा सनियंत्रण तथा तक्रार निवारण समितीची बैठक पार पडली. आरोग्य सहसंचालक डॉ दयानंद मोतीपवळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कमलाकर मुदखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, ज्येष्ठ नागरिक महासंघ प्रतिनिधी अनंत आचार्य, जिल्हाधिकारी कार्यालय वैद्यकीय समन्वय कक्ष प्रमुख डॉ. महेश लड्डा, वरिष्ठ जिल्हा समन्वयक आयुष्मान भारत योजना डॉ.मिलिंद जोशी, अंमलबजावणी सहाय्य संस्था विभाग प्रमुख डॉ.सुनील राजपूत, विभागीय दक्षता अधिकारी सुखदेव जाधव, डॉ. प्रगती माने, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रितेश यालकर, आरोग्यमित्र पर्यवेक्षक अकबर शेख आदी समिती सदस्य उपस्थित होते.

जिल्ह्यात दोन्ही योजना मिळून ३४ लाख ३१ हजार लोकांपर्यंत योजनांचे कार्ड पोहोचवावयाचे आहेत. त्यापैकी आतापर्यंत १० लाख ८७ हजार जणांना कार्ड देण्यात आले आहेत. हे कार्ड देण्यासाठी आशा स्वयंसेविका, आपले सेवा केंद्र व स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. त्यांच्याकडे या कार्डसाठी लॉग ईन सुविधा देण्यात आली आहे,अशी माहिती देण्यात आली.

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य मित्रांची संख्या, आयुष्मान कार्ड काढणे, रुग्णालय तक्रार निवारण, रुग्णालयांचे दावे वेळेवर मिळवून देणे या कामांना प्राधान्य देण्यात यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

०००००

संबंधित पोस्ट

हिरकणी महोत्सवाच्या तिस-या दिवशी महिलांसाठी रंगला ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यामध्ये दि.12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

कारागृहातील बंद्यांच्या मनपरिवर्तनासाठी मुलाखत कक्ष उपयुक्त- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- बंदी नातेवाईक भेटीसाठी मुलाखत कक्षाचे उद्घाटन – कौशल्य प्रशिक्षित बंद्यांना प्रमाणपत्र वितरण

राज्यात मानसिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करणार – मंत्री प्रकाश आबिटकर टेली-मानस हेल्पलाइनला ३ लाख २७ हजारांहून अधिक कॉल्स

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी साधणार आभासी संवाद..

शासकीय आश्रमशाळा पेंढरघोळ येथे ‘शालेय प्रवेशोत्सव’ उत्साहात चिमुकल्यांचे सजवलेल्या कारमधून आगमन