vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत गडचिरोलीत क्षयरोग जनजागृती रॅली*‘जोष टीम’च्या माध्यमातून एनसीसी कॅडेट्स व माय भारत स्वयंसेवकांचा जनजागृतीत सहभाग*

टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत गडचिरोलीत क्षयरोग जनजागृती रॅली*‘जोष टीम’च्या माध्यमातून एनसीसी कॅडेट्स व माय भारत स्वयंसेवकांचा जनजागृतीत सहभाग*

 

गडचिरोली, दि. १६ ऑक्टोबर (जिमाका) : क्षयरोगाबाबत समाजातील गैरसमज व भीती दूर करणे आणि रुग्णांना उपचारांचा संपूर्ण कालावधी पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणे, या उद्देशाने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत टीबीमुक्त भारत अभियानाच्या अनुषंगाने आज गडचिरोली येथे क्षयरोग जनजागृती रॅली काढण्यात आली. जिल्हा क्षयरोग केंद्र आणि शिवाजी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रॅलीत एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले.

 

यावेळी जिल्हा परिषदेचे सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोटुले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. माधव शिंदे, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सातपुते आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. किरण शिंदे उपस्थित होते.

 

टीबीमुक्त भारत अभियानामध्ये युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी एनसीसी कॅडेट्स आणि माय भारत स्वयंसेवकांच्या सहभागातून ‘जोष टीम’ तयार करण्यात आली आहे. विविध जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत क्षयरोगाविषयी माहिती पोहोचविणे आणि क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांना हातभार लावणे, ही या टीमची भूमिका असेल.

 

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. किरण शिंदे यांनी विद्यार्थ्यांना टीबीमुक्त भारत ॲप, ‘जोष टीम’चे कार्य आणि क्षयरोग जनजागृतीमधील एनसीसीची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. युवकांनी जनजागृती उपक्रमांत सक्रिय सहभाग घेऊन क्षयरोगाविषयी योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे त्यांनी सांगितले.

 

डॉ. संतोष कोटुले यांनी ग्रामीण भागातील जनजागृतीवर भर देण्याचे आवाहन केले. एनसीसी कॅडेट्सनी गावांमध्ये जाऊन नागरिकांच्या मनातील क्षयरोगाबाबतची भीती, गैरसमज आणि रुग्णांविषयी असलेला सामाजिक कलंक दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, उपचार सुरू असलेल्या रुग्णांना निर्धारित कालावधीपर्यंत नियमित औषधोपचार घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे त्यांनी सांगितले. ‘निक्षय मित्र’ म्हणून रुग्णांना आधार देण्याच्या भूमिकेबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी “टीबी हारेगा, देश जीतेगा” आणि “करना है, करके दिखाएंगे; भारत को टीबीमुक्त बनाएंगे” अशा घोषणा देत क्षयरोगमुक्त भारताचा संदेश दिला. क्षयरोगाबाबत जनजागृती आणि रुग्णांना उपचार पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या कार्यात युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

0000

संबंधित पोस्ट

गणरायाच्या दर्शनासोबत योजनांचा जागर!लोकसंवाद-२०२६’मधून शेगावात कृषी, आरोग्य, महिला-बालविकास व महसूल योजनांची माहिती

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी ‘मेकिंग द डिफरन्स’ एनजीओ व पीपीएफएएस म्युच्युअल फंडचा संयुक्त पुढाकार‘संजीवनी’ प्रकल्पांतर्गत दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण; प्रत्येकी ७० पेक्षा अधिक वैद्यकीय उपकरणांची मदत

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचा शुभारंभ

श्रीगणेशा आरोग्याचा २०२६जिल्हा कारागृहाला धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे वैद्यकीय उपकरणांचे मान्यवरांच्या उपस्थितीत आज (दि.१९) समारंभपूर्वक दान; आरोग्य शिबीरही

vishwatmaklokswamivarta

अमरावती जिल्हा उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज; ‘इन-क्रिस’ प्रकल्पांतर्गत उपाययोजनांना वेग..

एचआयव्ही बाधीत औषधोपचारांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता- जिल्हाधिकारी संतोष पाटील