vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पीएम-यशस्वी शिष्यवृत्तीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा• इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास व विमुक्त-भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना आवाहन

पीएम-यशस्वी शिष्यवृत्तीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा• इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास व विमुक्त-भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना आवाहन

जालना, प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या पीएम -यशस्वी योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल आणि टॉप क्लास एज्युकेशन इन कॉलेज या शिष्यवृत्ती योजनांचे नवीन व नूतनीकरणाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी तात्काळ अर्ज भरावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक अनंत कदम यांनी केले आहे.

या योजनांसाठी पात्र विद्यार्थ्यांनी दि. 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत. अर्ज भरणे आणि पडताळणीसाठी शासनाने वेळापत्रक निश्चित केले असून, विद्यार्थ्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. दि. 15 डिसेंबरपर्यंत अर्ज पडताळणी होणार असून, शैक्षणिक संस्थांच्या पडताळणीची अंतिम तारीख 15 डिसेंबर तर त्यापुढील स्तरावरील पडताळणी दि. 31 डिसेंबरपर्यंत करावी लागणार आहे.

सर्व पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल(एनएसपी)वर अर्ज पूर्ण करावेत. तसेच संबंधित शैक्षणिक संस्थांनीही योजनांच्या नियमांचे पालन करून अर्जांची पडताळणी निर्धारित वेळेत पूर्ण करावी. विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक अनंत कदम यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

बिनागुंडा परिसरात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची संयुक्त क्षेत्रभेट,जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतर बिनागुंडा परिसरात योजनांच्या अंमलबजावणीला गती वनपट्टेधारकांना फार्मर आयडी, घरकुल व विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन..

गणेश भक्तांचा प्रवास सुरक्षित आणि निर्विघ्न पार पडावा, यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज!

vishwatmaklokswamivarta

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय पीक स्पर्धा खरीप हंगाम अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजी

अहिल्यानगर जिल्हा कारागृहात बंदीवानांसाठी संगणक आणि सौर ऊर्जा प्रशिक्षण

राष्ट्रीय लोकअदालतीचे ९ मे रोजी आयोजन