vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

अनाथ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावेत.

अनाथ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावेत

रायगड-अलिबाग,द : प्रतिनिधी शासकीय नोकरी आणि शिक्षणामधील 1 टक्का समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले अनाथ प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया आता राज्य शासनाने पूर्णपणे ऑनलाईन केली आहे. महिला व बाल विकास विभागामार्फत ही महत्त्वाची सेवा आता महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार (Aaple Sarkar) पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हयातील पात्र उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करुन या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. श्रीकांत हावळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

यापूर्वी अनाथ प्रमाणपत्रासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात ऑफलाईन अर्ज सादर करावे लागत होते. आता ही संपूर्ण प्रक्रिया डिजीटल झाल्यामुळे अर्जदारांना घरबसल्या किया जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावरून (महा ई-सेवा केंद्र) अर्ज करता येणार आहे.

अर्ज कसा करावा?:- इच्छुक अर्जदारांनी शासनाच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in जाऊन आपली नोंदणी (Registration) करावी. लॉगिन केल्यानंतर ‘महिला व बाल विकास विभागः निवडून त्यातील अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र देणे या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर संस्थात्मक किंवा संस्थाबाह्य प्रवर्गानुसार आवश्यक माहिती भरून आधार कार्ड, जन्म दाखला, आई-वडिलांच्या मृत्यूचा दाखला, रहिवासी पुरावा आणि शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत. अपलोड करण्यात येणारी कागदपत्र ही स्पष्ट व वाचनीय असावीत.

पारदर्शकता आणि विहित मुदतीत सेवा : ही सेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या कक्षेत आणण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज सादर केल्यानंतर विहित कालमर्यादेत अर्जावर निर्णय घेणे बंधनकारक राहणार आहे. तसेच, अर्जदारांना मिळालेल्या ट्रॅकिंग आयडीद्वारे आपल्या अर्जाची सद्य:स्थिती ऑनलाईन तपासता येणार असून, विहित मुदतीत प्रमाणपत्र न मिळाल्यास ऑनलाईन अपील करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.अर्ज भरताना किंवा भरण्यासाठी काही मदत हवी असल्यास, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, दिपमहल, दुसरा मजला, श्री स्वामी समर्थ नगर, पिंपळभाट चेंढरे अलिबाग, Email ID: dwcdoraigad@gmail.com, wcdora@gmail.com ०२१४१-२९५३२१ या पत्त्यावर संपर्क करावा.

संबंधित पोस्ट

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘जीवन प्रमाण’ॲपद्वारे हयातीचे दाखले सादर करण्यासाठी विशेष अभियान

vishwatmaklokswamivarta

68 लोकसेवा ऑनलाईन उपलब्ध* *तीन दिवसात दिली जातात जन्म – मृत्यू प्रमाणपत्रे*

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात ‘डिजिटल जनगणने’ ची तयारी सुरू६४ फिल्ड ट्रेनर्सच्या प्रशिक्षणाने मोहीम सुरू

vishwatmaklokswamivarta

क्वांटम संगणन तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षेसमोर नवे आव्हान– आयबीएमचे संशोधन संचालक अमित सिंघी

सूर्यकिरण एरोबॅटिक चमुने प्रथमच मेरठच्या आकाशात केले हवाई प्रात्यक्षिक दोन दिवसांच्या हवाई प्रात्यक्षिकाला एक लाखांहून अधिक नागरिकांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

महा-पल्स एआय’ (MahaPulse) प्रकल्पाचा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शुभारंभ**जबाबदारी आणि गुणवत्ता यांचा मिलाप असणारा महा-पल्स एआय प्रकल्प राज्यातील आरोग्य क्षेत्राला दिशादर्शक ठरेल**-सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta