
ठाणे तालुक्यात अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर दाखल होणार फौजदारी गुन्हे
ठाणे, प्रतिनिधी):- ठाणे तालुक्यांतर्गत येणारे बाळकुम मंडळ, ठाणे मंडळ, मुंब्रा मंडळ या मंडळाच्या अखत्यारीमध्ये अनधिकृत गौण खनिज वापराच्या अनुषंगाने केलेल्या दंडाच्या आदेशानुसार संबंधितास अनेक वेळा संधी देवूनदेखील, महाराष्ट्र शासनास दंडाची रक्कम वेळेत न भरल्याने आता नवी मुंबई पाठोपाठ ठाणे, मध्ये देखील एकूण 52 कसूरदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश ठाणे तहसिलदार उमेश पाटील यांनी दिले आहेत.
संबंधितांना अनेक वेळा संधी देवूनही त्यांनी शासनाची दंडनीय रक्कम न भरल्याने त्यांच्यावर आता फौजदारी गुन्हा दाखल होणार असल्याबाबतची माहिती निवासी नायब तहसिलदार श्री.दिनेश पैठणकर यांनी दिलेली आह गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन व दंड थकवणाऱ्या ५२ बड्या कंपन्या व व्यक्तींविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे (FIR) दाखल करण्याचे आदेश ठाणे तहसिलदारांनी दिले आहेत.
ठाणे व बेलापूर महसूल क्षेत्रांतर्गत गौण खनिजाचे (वाळू, माती, दगड) अनधिकृत उत्खनन, साठवणूक व वाहतूक केल्याप्रकरणी आकारण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा दंड वारंवार नोटीस देऊनही न भरणाऱ्या संबंधित व्यक्ती व बांधकाम कंपन्यांविरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हे (FIR) दाखल करण्याचे सक्त आदेश ठाणे तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी श्री. उमेश पाटील यांनी दिले आहेत. महसूल व वन विभागाच्या दि. २३ जून २०२५ च्या शासन परिपत्रकानुसार, शासकीय महसुलाची बुडवणूक करणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार बाळकूम, मुंब्रा आणि ठाणे मंडळातील एकूण ५२ कसूरदारांवर (व्यक्ती व संस्था) गुन्हे नोंदवण्यासाठी परिमंडळ १ (ठाणे शहर विभाग) व परिमंडळ ५ (वागळे इस्टेट – घोडबंदर विभाग) अंतर्गत येणाऱ्या १३ पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवण्यात आले आहे
फौजदारी कारवाईचे आदेश दिलेले सर्व ५२ कसूरदार व दंडाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:१. बाळकूम मंडळ (१३ कसूरदार):१. गणेश पाटील, बाळकूम पाडा नं. २ – ₹११,०७,४८८/-
२. सचिन विनय घरत, सतिश घरत (मौजे कोलशेत) – ₹६६,४४,९२८/-
३. सचिन विनय घरत, सतिश घरत (मौजे कोलशेत) -₹१२,४३,३९२/
४. अॅपकॉन्स, सीए-१२ – ₹१,८४,६२,५६०/-
५. सोहम लिलाधर भोईर व इतर (मौजे बाळकूम) – ₹६,८१,३११/-
६. प्रगती कंस्ट्रक्शन (मौजे बाळकूम) – ₹१४,४९,८२४/-७. अमित हजारे (मौजे बाळकूम) – ₹२०,३८,३५२/-८. मे. जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट, कासारवडवली ते भाईंदरपाडा – ₹२,७२,०२,९२८/-९. श्याम पाटील (मौजे कावेसर) – ₹६१,८१,०००/
१०. शिवराज चव्हाण (मौजे बाळकूम) – ₹१०,६७,२००/-
११. द्वारकाबाई लक्ष्मण पाटील, भानुबाई लक्ष्मण पाटील, परेश लक्ष्मण पाटील – ₹५६,७६,६००/-१२. हरीकेश बी. सिंग, मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA – मौजे कावेसर) – ₹७७,२७,१०,०३७/-१३. एन ए कंस्ट्रक्शन (मौजे चितळसर मानपाडा) – ₹२५,१७,६००/-२. मुंब्रा मंडळ (१८ कसूरदार):१. श्री.नारायण धनाजी चौधरी (मौजे साबे) – ₹२,९९,२२,३०४/-२. महेश निळकंठ पाटील (मौजे साबे) – ₹२२,२०,९९२/-३. आदित्य गोयल, लता गोयल, नरेश शनिचार भोईर (मौजे दिवा) – ₹८१,८४,०००/-४. गणपत शंकर भगत (मौजे साबे) – ₹४६,४६,४००/-
५. आदित्य गोयल, लता गोयल, अनामिका अरविंद गुप्ता, धिरज छोटेलाल गुप्ता (मौजे दिवा) – ₹३०,२८,७००/-६. गणपत आत्माराम पाटील, प्रेमजी लखमशी कारीया, ब्राईट्स स्काय हाईट्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि. – ₹१,३२,०१,२६४/-७. श्री. उत्तमकुमार जयवंत सावंत (मौजे आगासन) – ₹३६,७९,९६८/-८. भावनाबेन दिलीप पटेल (मौजे मुंब्रा) – ₹१,५१,७५,५८४/-९. श्री. दामू गोमा वल्लिकर, श्री. राजू गोमा वल्लिकर (मौजे डावले) – ₹४९,७६,७०४/-१०. श्री. विजय अनंत भोईर (मौजे साबे) – ₹१८,५६,९२८/-११. लता गोयल, आदित्य गोयल, एकनाथ भगत, प्रदीप भोईर, प्रकाश म्हात्रे (मौजे दिवा) – ₹१७,९२,८००/-१२. मे. शायाना कॉर्पोरेशन, ठाणे मनपा (कौसा) – ₹४२,४२,०००/-१३. रामदास मोतीराम भोईर (रा. साबे) – ₹५,८५,६००/-१४. सोमनाथ अर्जुन भगत व इतर ५ (रा. मौजे साबे) – ₹७,१४,०४८/-१५. श्री. वामन नानू भोईर (मौजे साबे) – ₹४,०७,०२,८७६/-१६. आदित्य गोयल, लता गोयल (मौजे दिवा) – ₹६,५१,२२,३८४/-१७. आदित्य गोयल, लता गोयल (मौजे दिवा) – ₹३,४६,३५,९२०/-१८. आ. कादीर अल्ली सो व इतर (मौजे डावले) – ₹१४,२४,३९३/-३. ठाणे मंडळ (२१ कसूरदार):१. भगवानदास मौर्या, नुतन को.ऑ.हौ.सो. (टिका नं. ११) – ₹२२,३०,४४८/२. श्री. विजय विष्णू माळवे (मौजे नौपाडा) -₹११,७३,१२१/-३. महत कंस्ट्रक्शन एल एल पी (मौजे पाचपाखाडी) -₹१९,२०,००२/-४. ऑटो कंस्ट्रक्शन (मौजे माजिवाडे) – ₹१,७१,०७,२९६/-५. वंदना सोसायटी, नौपाडा – ₹१४,४७,१६,२४०/- (किंवा ₹१,४४,७१,६२४/- मूळ कागदपत्रानुसार तपासणीस अधीन)६. मे. मँगनम एंटरप्रायजेस तर्फे श्री. एस. के. अँतोनी (मौजे नौपाडा) – ₹४५,२४,१२८/-७. एस के डेव्हलपर्स तर्फे भागीदार अनवर एस कासम (मौजे पाचपाखाडी) – ₹७,४१,२००/-८. मे. अर्णव कंस्ट्रक्शन तर्फे नुपेंद्र दास (मौजे चंदनवाडी) – ₹३३,९३,६९६/-९. महाकाली डेव्हलपर्स (मौजे पाचपाखाडी) – ₹६३,७३,३९६/-१०. मे. यश डेव्हलपर्स शिल्पा को.ऑ.हौ.सो. (मौजे पाचपाखाडी) – ₹८६,८०२/-११. अमर वैशाली को.ऑ.हौ.सोसायटी तर्फे बाहुबली धामणे (मौजे नौपाडा) – ₹४,५२,८५०/-१२. अनंतनाथ एंटरप्रायजेस टेकलाईन (मौजे नौपाडा) – ₹६२,७९,३९२/-१३. रचना सोसायटी तर्फे ऋषभ जोशी (टिका नं. १५) – ₹१२,३१,२८८/१४. रमेश गजानन पानसे (मौजे पाचपाखाडी) -₹१,३४,४००/-
१५. भिमाबाई भिकु किणी कु.प्र., वैभव लक्ष्मी असोसिएटस् तर्फे योगेश शशिकांत कदम – ₹५,०३,७३६/-१६. रेलकॉन इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. (मौजे कोपरी) – ₹४६,४९,३६०/-१७. मे. महावीर रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., भुयारी गटार टप्पा १ – ₹१,९६,७४,४००/-१८. मे. इफिकॉनस कन्सल्टस प्रा. लि. (मौजे ठाणे) – ₹५६,२९,९५३/-१९. मे. जोशी एंटरप्रायजेस तर्फे मंगेश ओक (मौजे पाचपाखाडी) – ₹१०,८०,०००/-२०. अनुदान प्रॉपर्टीज तर्फे श्री. सुब्रमण्यम पांडुरंग शिंदे (मौजे पाचपाखाडी) – ₹४०,१२,१२५/-
१. मे. व्ही. राज बिल्डकॉन प्रा. लि. (मौजे कोपरी) – ₹१०,४८,९७०/-
या सर्व संस्था व व्यक्तींवर खालील कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होणार असून संबंधित कसूरदारांवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०३(२) (शासकीय मालमत्ता/नैसर्गिक संसाधनांची चोरी), कलम ३१८(४) (शासकीय महसुलाची फसवणूक), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, खाण आणि खनिज अधिनियम १९५७, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात येणार आहेत. तसेच सराईत गुन्हेगारांवर (Habitual Offenders) ‘MPDA’ कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्तावही विचाराधीन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या प्रक्रियेत पोलीस प्रशासनास पूर्ण सहकार्य करण्यासाठी आणि गुन्हे दाखल करण्यासाठी बाळकूम, मुंब्रा व ठाणे येथील संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
00000000000



