vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्या

बुलढाण्यात आता रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा! केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते २८ नोव्हेंबरला रोबोटिक सर्जरी युनिटचे उद्घाटन • मुंबई, नागपूर, पुणे व छत्रपती संभाजीनगरनंतर बुलढाण्यात अत्याधुनिक सुविधा• उद्घाटनाच्या दिवशीच होणार पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया

बुलढाण्यात आता रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा! केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते २८ नोव्हेंबरला रोबोटिक सर्जरी युनिटचे उद्घाटन • मुंबई, नागपूर, पुणे व छत्रपती संभाजीनगरनंतर बुलढाण्यात अत्याधुनिक सुविधा• उद्घाटनाच्या दिवशीच होणार पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया

बुलढाणा, प्रतिनिधी : वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आता बुलढाण्यातही उपलब्ध होणार आहे. राजमाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा येथे शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता रोबोटिक सर्जरी युनिटचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे. या अत्याधुनिक सुविधेसाठी बुलढाणा येथे पाच रोबोटिक युनिट प्राप्त झाले असून, उद्घाटनाच्या दिवशीच पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या शासकीय आरोग्य सेवेत आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भर पडणार आहे.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांमुळे मुंबई, नागपूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांनंतर आता बुलढाणा येथेही रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध होत आहे. या सुविधेमुळे बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचा लाभ स्थानिक स्तरावर मिळणार आहे. परिणामी, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची रुग्णांची गरज कमी होण्यास मदत होणार आहे.

रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे अधिक अचूकता : रोबोटिक शस्त्रक्रिया ही आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण प्रगती आहे. या तंत्रज्ञानामध्ये रोबोट स्वतः शस्त्रक्रिया करत नाही, तर कुशल शल्यचिकित्सकाला अधिक अचूकता, नियंत्रण आणि सूक्ष्म हालचालींसह शस्त्रक्रिया करण्यास मदत करतो. शल्यचिकित्सक विशेष नियंत्रण प्रणालीच्या माध्यमातून रोबोटिक उपकरणांचे संचालन करतात.

या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेदरम्यान अधिक नेमकेपणा साधता येतो. काही प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत रक्तस्राव कमी होणे, लहान छेद, कमी वेदना, संसर्गाचा तुलनेने कमी धोका आणि रुग्ण लवकर पूर्ववत होणे असे फायदे मिळू शकतात. तसेच रुग्णालयातील मुक्कामाचा कालावधी कमी होण्यासही मदत होते. शरीराच्या नाजूक आणि अवघड भागांमध्ये शस्त्रक्रिया करताना या तंत्रज्ञानाचा विशेष उपयोग होतो. त्रिमितीय (3D) दृश्य प्रणालीमुळे शल्यचिकित्सकाला शस्त्रक्रियेच्या भागाचे अधिक स्पष्ट आणि मोठे दृश्य मिळते.

जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक उपचारांचा लाभ : राजमाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोबोटिक सर्जरी युनिट सुरू झाल्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची भर पडणार आहे. शासकीय वैद्यकीय संस्थेत ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध झाल्याने सामान्य रुग्णांनाही या तंत्रज्ञानाचा लाभ मिळण्याची संधी निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय सेवांचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (एनएमआयएमसी) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार• एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्था विकसित करण्यासाठी 1.2 अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची बांधिलकी..

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वासिंदच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण..ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल…

महिला व बाल विकास विभागात भरणार ८ हजारांवर पदे

मेळघाटात बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात ‘निसर्ग अनुभव’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद 33 वाघ आणि शेकडो वन्यजीवांचे पर्यटकांना दर्शन..

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सुरू करण्यात आलेल्या दादर–नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बससेवेचा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते प्रारंभ