vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महात्मा फुलेंच्या अर्थनीतीवर  शासकीय विभागीय ग्रंथालयात व्याख्यान

महात्मा फुलेंच्या अर्थनीतीवर  शासकीय विभागीय ग्रंथालयात व्याख्यान

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी) महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच संविधान दिनाचे औचित्य साधून शासकीय विभागीय ग्रंथालय, सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील समर्थनगर येथील शासकीय विभागीय ग्रंथालयात सकाळी ११ वाजता ‘महात्मा फुलेंची अर्थनीती – श्रमाला प्रतिष्ठा, शिक्षणाला संपत्ती’ या विषयावर हे व्याख्यान होणार आहे. उद्योजक अभियंता तथा अर्थविषयक अभ्यासक डॉ. डी. एस. काटे हे व्याख्यानातून महात्मा फुले यांच्या आर्थिक विचारांचा आणि श्रम व शिक्षणविषयक दृष्टिकोनाचा उहापोह करणार आहेत.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे हे राहणार असून, पी. यू. जैन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय पाटोदी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.

महात्मा फुले यांचे विचार, त्यांची अर्थनीती आणि शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या व्याख्यानास वाचक, विद्यार्थी आणि साहित्यरसिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

24 मार्च रोजी पुणे येथे डाक अदालत

तलाठी निवडीच्या बनावट आदेशांना बळी पडू नका;जिल्हा प्रशासनाचे आवाहन

७७ वा प्रजासत्ताक दिन : राष्ट्रपती भवनातील ‘ॲट होम’ सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण

vishwatmaklokswamivarta

समान काम, समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र!शासनाच्या वेळकाढू धोरणाविरोधात महाराष्ट्रभर काळ्या फिती लावून निषेध; उद्या जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1680 प्रकरणे निकाली7 कोटी 68 लाख रुपयांची तडजोड

शेतकरी हिताला प्राधान्य, 15 ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगामाला सुरुवात!

vishwatmaklokswamivarta