vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणांना गती देण्याच्या मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांच्या सूचना  जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणांना गती देण्याच्या मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांच्या सूचना  जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

 

सांगली, प्रतिनिधी.) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी आवश्यक असलेल्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद हरिबा काळे, डॉ. निलिमा सरप (लखाडे) आणि डॉ. ओमप्रकाश जाधव यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विविध विषयांचा सविस्तर आढावा घेताना या सूचना दिल्या. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष स्नेहल भोसले, उपायुक्त नागनाथ चौगुले, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे, सदस्य सचिव मेघराज भाते, तसेच मिरज, जत, पलूस-कडेगाव, वाळवा-इस्लामपूर आणि खानापूर-विटा येथील प्रांताधिकारी उपस्थित होते.बैठकीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, तसेच आवश्यक त्या ठिकाणी समन्वय साधून कार्यवाही गतिमान करण्याच्या सूचना आयोगाच्या सदस्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सांगली जिल्ह्यात कार्यरत आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या भौतिक सुविधा, शैक्षणिक वातावरण तसेच आश्रमशाळा व वसतिगृह अधीक्षक पदांच्या स्थितीचाही आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आश्रमशाळांना नियमित भेटी देऊन आवश्यक सूचना द्याव्यात आणि कार्यप्रणाली अधिक परिणामकारक करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा, असे निर्देशही आयोगाच्या सदस्यांनी यावेळी दिले.

00000

संबंधित पोस्ट

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या संजय घाडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, ११ फेब्रुवारीला होणार निवड.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १,०२८ केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पुढे ढकलण्यात आली

आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार – मंत्री जयकुमार रावल १७ ऑगस्ट हा दिवस ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार – मंत्री शंभूराज देसाई

राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेत सीईओ विशाल नरवाडे मांडणार कडेपूर ग्रामपंचायतीचा डिजीटल ग्रामविकास- महाराष्ट्र राज्यातर्फे नामनिर्देशन- धर्मशाळा येथे 16, 17 ऑक्टोबरला कार्यक्रम

ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकात हजारो नागरिकांनी केले महामानवाला अभिवादन

हरित महाराष्ट्र’साठी जिल्ह्यात वृक्ष लागवड उद्दिष्टपूर्तीचे नियोजन करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी जिल्ह्यातील २१,९४० हेक्टरवर २कोटी ४४लाख वृक्षारोपण.