vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांना चारा बियाणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांना चारा बियाणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

जालना, प्रतिनिधी) : सन 2026-2027 या वर्षामध्ये संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी चारा उत्पादन कार्यक्रम अंतर्गत चारा बियाणे वाटप करण्यात येणार आहे. ज्या लाभधारकांकडे सिंचनाची सोय आहे, व ज्यांच्याकडे पशुधन आहेत अशा लाभधारकांना 100 टक्के अनुदानावर चारा बियाणे वितरीत करण्यात येणार आहे. संभाव्य एल-निनो या हवामान घटकांचा प्रतिकुल परीणाम होण्याची शक्यता असलयाने चारा टंचाई टाळण्यासाठी चारा बियाणांसाठी इच्छूकांनी अर्ज करावेत. तसेच संभाव्य चारा टंचाई निर्माण होवु नये, व चारा छावण्याची वेळ पडू नये याकरीता आतापासुनच चारा निर्मीती व त्याच्या साठवणुकीबाबतचे अचुक नियोजन करणे आवश्यक आहे.

ज्या लाभार्थ्याकडे भारत पशुधन प्रणाली किंवा केंद्र सरकारने वेळोवेळी निर्देशीत केलेल्या प्रणालीवर नोंद असलेली स्वत: ची किमान 3 ते 4 जनावरे आहेत, अशा लाभधारकांना प्राधान्य देण्यात येईल. एका आर्थीक वर्षात एका लाभधारकांस एकदाच लाभ अनुज्ञेय राहणार आहे. तरी इच्छूक शेतकऱ्यांनी दि. 05 मे, 2026 पर्यत आपले अर्ज संबधीत आपल्या गावातील पशुवैद्यकिय संस्थेकडे सादर करावीत, असे आवाहन पशुसंवर्धन विभाग, जिप, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

पुण्यातील पिंपरी-चिंचवड विभागातील दुर्दैवी घटना-दरड कोसळल्याप्रमाणे कचरा इमारतीवर आला; पिंपरीमध्ये इमारत कोसळल्यानंतर अधिकाऱ्याने सांगितला घटनाक्रम, आतमधून मदतीसाठी आवाज….

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यासाठी 132 किलोलिटर केरोसीन मंजूर,तात्पुरत्या स्वरूपात वितरण सुरू- सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके-पलूस व तासगाव तालुक्यात वाटप गतिमान, इतर तालुक्यांतही लवकरच पुरवठा…

नागपूर कृषी उत्पन्न बाजाराला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी स्वीकारला पदभार

पार्टिसिपेट मुंबई’तून जनसहभागाला नवी दिशा मिळणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· ‘समग्र’च्या सहकार्याने महापालिकेच्या सेवा अधिक गतिमान होणार· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार्टिसिपेंट मुंबई उपक्रमाचे लोकार्पण

येत्या 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

vishwatmaklokswamivarta

ऑनलाइन फसवणूक, जुगार व अवैध सायबर कृत्यांविरोधात कठोर कारवाईचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश