लातूर प्रतिनिधी-”यंदा अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट ओढावले आहे. या कठीण काळात समाजाने शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता जपावी आणि मदतीसाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी केले आहे.
चाकूर तालुक्यातील सैनिकांची हाडोळी येथे ‘नाम फाउंडेशन’, ‘लक्ष्मीबाई कृष्ण संस्था’ आणि ‘मावळा प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माणुसकीची दिवाळी’ कार्यक्रमात ते बोलत होते.
✨ या कार्यक्रमाची काही ठळक वैशिष्ट्ये:🔸 ३०० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्याची (रेशन) भेट देण्यात आली.🔸 ५० निराधार शेतकऱ्यांना आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.🔸 केवळ शिक्षण घेऊन चालत नाही, तर समाजातील दुःख समजून घेण्याची संवेदनशीलता प्रत्येकात असायला हवी, असा मोलाचा संदेश यावेळी देण्यात आला.याप्रसंगी ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारूका यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संकटाचे दिवस नक्कीच संपतील, आपल्या बळीराजाने खचून न जाता धैर्याने उभे राहावे! 🙏 बळीराज्याला आधार देण्यासाठी आपणही पुढे येऊया!