vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

१३.५९ सेकंदांचा थरार आणि तिरंग्याची शान!शौर्या अंबुरेची युथ ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी

१३.५९ सेकंदांचा थरार आणि तिरंग्याची शान!शौर्या अंबुरेची युथ ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी

ठाणे, प्रतिनिधी:- ठाणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोखत येथील प्रतिभावान क्रीडापटू शौर्य अंबुरे हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी फडकवली आहे. डकार २०२६ युथ ऑलिम्पिक गेम्समधील महिलांच्या १०० मीटर हर्डल्स (अडथळा दौड) स्पर्धेत शौर्या अंबुरे हिने कांस्यपदकाची कमाई करत संपूर्ण देशासह ठाणे जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे. अत्यंत अटीतटीच्या व रोमांचक झालेल्या या स्पर्धेत तिने १३.५९ सेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवत केवळ पदकच जिंकले नाही, तर १३.७० सेकंदाचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत नवा राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला आहे.

 

            पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी अविनाश अंबुरे आणि रूपाली अंबुरे यांची ही कन्या असून, घरच्या संस्कारांमधून मिळालेली जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर तिने हे यश संपादन केले आहे. तिच्या या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व यशाने ठाणे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले असून संपूर्ण ठाणेकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.

 

            शौर्या अंबुरे हिच्या या प्रेरणादायी यशाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के आणि समस्त जिल्हा प्रशासन व क्रीडाप्रेमी ठाणेकरांकडून तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील क्रीडा प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

 

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धेसाठी १० जुलैपर्यंत नोंदणी; शाळांनी सहभागाचे आवाहन

नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धेत दिवागांव इलेव्हन ग्रामीण तर युनायटेड ऐरोली शहरी गटातील विजेतेपदाचे मानकरी…

“मिशन लक्ष्यवेध” जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अंतर्गत खेळाडू निवड चाचणी आयोजित

बुलढाणा येथे उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबीर! 

मेरा युवा भारत अंतर्गत पी.एन.पी कॉलेज येथे जिल्हा क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी १५-१६ एप्रिल रोजी निवड चाचणी..