vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिवाळी आपल्या दारी’ उपक्रम:पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते वडगाव कोल्हाटी येथे विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण

‘दिवाळी आपल्या दारी’ उपक्रम:पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते वडगाव कोल्हाटी येथे विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- ‘दिवाळी आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत भाऊबीजेनिमित्त ग्रामपंचायत वडगाव कोल्हाटी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले.ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करताना होणारा त्रास कमी व्हावा, त्यांचा वेळ वाचावा आणि शिक्षणात सातत्य राहावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

विद्यार्थिनींनी या सायकलचा वापर करून आपले शाळेतील येणे जाण्याच्या वेळेत बचत करून अभ्यासाचा वेळ वाढवावा, आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री शिरसाट यांनी विद्यार्थिनींना केले.

या प्रसंगी शाळेतील विद्यार्थिनींनी उपस्थित मान्यवरांचे औक्षण करून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले.सायकली मिळाल्याने विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

सरपंच सुनील काळे,पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब गाढे, पंचायत समिती सदस्य मोहिनी ढमढरे, स्वप्नील अडसूळ, योगेश साळे, रमेश पाटील, संतोषसिंग ठाकूर यांच्यासह माजी महापौर नंदकुमार घोडेले, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी पालकमंत्री शिरसाट यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा. उच्च शिक्षण घेऊन आपले, आपल्या कुटुंबाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे. आजचे विद्यार्थी हेच उद्याच्या विकसित भारताचे शिल्पकार आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून देश घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीने पुढे जावे, असे आवाहन केले.

प्रास्ताविक पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब गाढे यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक राहुल मांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन महेंद्र बारवाल यांनी केले.

संबंधित पोस्ट

जनगणना २०२७ साठी आज १ मे पासून होणार स्वयं-नोंदणी सुरू-नागरिकांनी सहभागी होण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

पंचनाम्यात एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहू नये; अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम करावे – पालकमंत्री जयकुमार गोरे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे १०० टक्के क्षेत्राचे सरसकट पंचनामे करावेत

कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निमिर्ती कार्यक्रमात जिल्ह्याची भरारी1 हजाराहून अधिक प्रकरणांना मंजुरी*राज्याच्या अग्रगण्य जिल्ह्यात स्थान

धनगर आरक्षणासाठी महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक