मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिर दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत दर्शनासाठी बंद राहणार.मुंबादेवी मंदिरात १४ नोव्हेंबर रोजी अन्नकूट महोत्सव; दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत दर्शन बंद
मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिर दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत दर्शनासाठी बंद राहणार.मुंबादेवी मंदिरात १४ नोव्हेंबर रोजी अन्नकूट महोत्सव; दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत दर्शन बंद
मुंबई प्रतिनिधी: लाभ पंचमीच्या निमित्ताने श्री मुंबादेवी मंदिरात शनिवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२६ रोजी वार्षिक अन्नकूट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाच्या तयारीसाठी मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. भाविकांना सूचित करण्यात आले आहे की, अन्नकूट महोत्सवाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर दुपारी ३ ते ४ या वेळेत मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.
त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येताना या वेळेची नोंद घ्यावी, असे आवाहन श्री मुंबादेवी मंदिर विश्वस्त निधीच्या व्यवस्थापकांकडून करण्यात आले आहे.
महत्त्वाची सूचना:- दिनांक : १४ नोव्हेंबर २०२६, शनिवार निमित्त : लाभ पंचमी- कार्यक्रम : वार्षिक अन्नकूट महोत्सव मंदिर बंद : दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत