vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत सन्मान व समारोप समारंभ संपन्न

रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत सन्मान

व समारोप समारंभ संपन्न

राज्य प्रतिनिधी- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण (रायगड) तर्फे रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत सन्मान व समारोप समारंभ उत्साहात पार पडला. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी तसेच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विष्णू घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस उप अधीक्षक जालिंदर नालकुल उपस्थित होते. यावेळी दादर सागरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ब्राह्मणे, पेण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री. संदीप बागुल, रायगड वाहतूक विभाग प्रमुख श्रीमती सरिता चव्हाण उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विष्णू घोडे यांनी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. तसेच या उपक्रमांच्या परिणामस्वरूप रायगड जिल्ह्यात अपघातांमध्ये झालेली घट अधोरेखित केली.

या वेळी इंस्टाग्राम रिल्स स्पर्धा, निबंध, चित्रकला आणि प्रश्नमंजुषा स्पर्धांतील विजेत्यांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, धनादेश व हेल्मेट देऊन गौरव करण्यात आला. तसेच रस्ता सुरक्षेत उल्लेखनीय योगदान देणारे स्वयंसेवक आणि संस्थांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये श्री. संजय (अण्णा) साबळे, श्री. हरीश बेकावडे, श्री. विजय (भाऊ) पाटील, श्री. चैतन्य पाटील, कालभैरव रेस्क्यू टीम (पोलादपूर) आणि सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था, रायगड यांचा समावेश होतयाशिवाय, अपघातमुक्त सेवा देणाऱ्या तसेच अपघातग्रस्तांना तातडीची मदत करून ‘जीवनदूत’ ठरलेल्या चालकांचाही सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन करत नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

संबंधित पोस्ट

महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध – महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे,बचतगट, सुरक्षा, कौशल्य विकास व सायबर साक्षरतेवर भर

पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७(१) व (३) आदेश जारी

कराटे प्रशिक्षणामुळे मुलींना सुरक्षिततेचा नवा आत्मविश्वास- जिल्हाधिकारी अशोक काकडे- सांगलीच्या लेकी झाल्या ‘फायटर’! 38 हजार विद्यार्थिनी घेत आहेत स्वसंरक्षणाचे धडे

vishwatmaklokswamivarta

कोरेगाव येथे 6 मे रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर नाशिक जिल्ह्यातील जांबुटके येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जमिनीचे हस्तांतरण

भय्यासाहेब आंबेडकर : फुले-आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातील दुर्लक्षित पान: डॉ. संजय मून

vishwatmaklokswamivarta