vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय..

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय..

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार, ७ डिसेंबर ते शुक्रवार, १८ डिसेंबर २०२६ या कालावधीत नागपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. विधानभवन येथे आयोजित विधानसभा आणि विधानपरिषदेच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, नाना पटोले, विजय वडेट्टीवार जितेंद्र आव्हाड, सुनील प्रभू, अमीन पटेल, विधानपरिषद सदस्य अनिल परब, विक्रम काळे, सतेज पाटील, प्रवीण दरेकर आणि विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आगामी हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीबाबत सविस्तर चर्चा करून ७ ते १८ डिसेंबर २०२६ या कालावधीत अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दोन आठवड्यांच्या विधिमंडळ कामकाजाच्या नियोजनाचा आढावा घेऊन त्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

00000

संबंधित पोस्ट

स्ट्रोक उपचार प्रभावी करण्यासाठी ‘स्ट्रोक समिट’ मधील तज्ज्ञांच्या सूचनांचे स्वागत – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सव रविवारपासून  -निसर्ग पर्यटनाधारित साहसी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल..🌳 जिल्ह्यातील निसर्गप्रेमींमध्ये उत्साह; उपक्रमांना मोठा प्रतिसाद 

vishwatmaklokswamivarta

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साहित्यिक कलागुणांसाठी ‘आपलं मंत्रालय’ सशक्त व्यासपीठ – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह ‘आपलं मंत्रालय’च्या काव्यसंध्येने दीपोत्सवात फुलला शब्दांचा आनंदोत्सव

vishwatmaklokswamivarta

एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई व पीक पेरणीचे नियोजन करा- प्रविणकुमार देवरे    • जिल्हाधिकारी यांनी घेतला विविध विषयाचा आढावा • शेतकऱ्यांनी घाईगडबडीत पेरणी करू नये; गाव पातळीवर जनजागृती करण्याचे निर्देश

मुंबई पोलिसांच्या १२९० वाहनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित-श्रीगणेशदर्शन स्पर्धा व दुर्गबांधणी स्पर्धेचे 26 फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरण