vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

एनएमएमएस परीक्षेच्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढ ; नियमित शुल्कासह १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार अतिविलंब शुल्काची मुदत रद्द

एनएमएमएस परीक्षेच्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढ ; नियमित शुल्कासह १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार अतिविलंब शुल्काची मुदत रद्द

 

 अमरावती, प्रतिनिधी: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेसाठी ऑनलाइन शाळा नोंदणी आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली असून आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in⁠ आणि www.mscenmms.in⁠ संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. २० डिसेंबर २०२६ रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार, नियमित शुल्कासह ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची मुदत ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२६ अशी करण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत ६ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२६ अशी होती. तसेच विलंब शुल्कासह आवेदनपत्र भरण्याची मुदत १५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, यापुढे अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्रे भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. २१ ऑक्टोबर २०२६ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची नोंद घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून करण्यात आले आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना-मुदतवाढीची ती बातमी खोटी

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते ध्वजवंदन*

vishwatmaklokswamivarta

स्वाधार’च्या प्रलंबित अर्जांसाठी विशेष मोहीम;त्रुटी दूर करण्यासाठी १६ मार्चपासून कार्यशाळेचे आयोजन

चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : लाभार्थ्यांना धनादेश व दाखल्यांचे वितरण

सामूहिक तेलबिया पीक प्रात्यक्षिकांतर्गत शेतकरी प्रशिक्षण व शेती शाळा संपन्न नागापूर येथे सोयाबीन व्यवस्थापनावर मार्गदर्शन; प्रक्षेत्र भेटीतून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निरसन

जालना जिल्ह्यात जनगणना २०२७ ची तयारी पूर्णत्वाकडे; १६ मेपासून घर सूचीकरण मोहिमेला सुरुवात