vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नव्या मुंबईत बांधकामामुळे होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी मानक कार्यप्रणालीचे काटेकोर पालन करण्याचे विकासकांना निर्देश

नव्या मुंबईत बांधकामामुळे होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी मानक कार्यप्रणालीचे काटेकोर पालन करण्याचे विकासकांना निर्देश

       नवी मुंबई प्रतिनिधी   नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुरु असलेल्या बांधकामामुळे वाढत्या धूळ व वायू प्रदुषणाबाबत बांधकाम परवानगी धारकांनी व विकासकांनी अवलंबावयाच्या वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण याबाबतच्या मानक कार्यप्रणालीचे (Standard Operating Procedure – SOP) काटेकोरपणे पालन करणेबाबत महापालिका आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने सहायक संचालक, नगररचना श्री.सोमनाथ केकाण यांनी विशेष बैठक घेत सर्व बांधकाम परवानगी धारक / विकासकांना नियम पालनाचे निर्देश दिले.

          या बैठकीमध्ये मा. उच्चस्तरीय समितीच्या (HPC) बैठकीदरम्यान नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या धूळ व वायू प्रदूषणाच्या अनुषंगाने संबंधित बांधकामांचे विकासक व वास्तुविशारद यांना जबाबदार धरुन मानक कार्यप्रणालीत नमूद केल्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे उपस्थित सर्व विकासक व वास्तुविशारद यांना अवगत करण्यात आले.

            तसेच, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्वतःहून दाखल केलेल्या Suo Motu Public Interest Litigation No. ३ of २०२३ या प्रकरणाच्या अनुषंगाने वेळोवेळी पारित केलेल्या आदेशांनुसार मुंबई व मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी विहित मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे पुनश्च: नमूद करण्यात आले.

            त्या अनुषंगाने वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण याबाबतच्या मानक कार्यप्रणालीमधील प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्रामध्ये पूर्तता करावयाच्या बाबींपैकी भूखंडाभोवती 30 फूट उंचीचे पत्रे बसविणे व ग्रीन नेट लावणे, फॉगर मशीन बसविणे, वायू प्रदूषणाचे मोजमाप करणेबाबतचे यंत्र (AQI Digital Monitor) बसविणे, स्प्रिंकलर बसविणे, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविणे, पदपथ व रस्ते स्वच्छ ठेवणे इ. बाबींची पूर्तता करणे अनिवार्य असल्याचे निर्देशित करण्यात आले.

            नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी तळघराच्या बांधकामासाठी खोदकाम करतेवेळी बऱ्याच ठिकाणी ध्वनी प्रदूषण होऊन आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असतात. त्या अनुषंगाने संबंधित विकासक / वास्तुविशारद यांनी अशा कामांबाबत ठराविक वेळेतच हे काम करावे, याची खबरदारी घेण्याचे सूचित करण्यात आले.

          आपणही नवी मुंबईचे नागरिक आहात त्यामुळे आपल्या शहराचे वातावरण स्वच्छ आणि शुध्द राखणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट करीत सर्व बांधकाम व्यावसायिक व वास्तुविशारद यांनी मानक कार्यप्रणालीमधील निकषांचे काटेकोर पालन करण्याचे यावेळी निर्देशित करण्यात आले.

00000

संबंधित पोस्ट

सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने पदभरती

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मौजा कोठी तसेच उपपोस्टे व्यंकटापूर येथे आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन

शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्यासाठी एकात्मिक शेती पद्धत आवश्यक – केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी संवाद कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईतील नालेसफाईची महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी उपमहापौर व आयुक्तांसह केली प्रत्यक्ष पाहणी

महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबईतर्फे आयोजित ‘सेव्हिंग लाइव्ह्ज. बिल्डिंग अ हेल्दियर भारत’ या राष्ट्रीय अभियानाचे उदघाटन.

ज्येष्ठ नागरिकांना मुंबईत छत्री वाटप